व्होडाफोन इंडियाची व्होडाफोन 'एम-पेसा पे' सुविधा

 Lower Parel
व्होडाफोन इंडियाची व्होडाफोन 'एम-पेसा पे' सुविधा
व्होडाफोन इंडियाची व्होडाफोन 'एम-पेसा पे' सुविधा
व्होडाफोन इंडियाची व्होडाफोन 'एम-पेसा पे' सुविधा
व्होडाफोन इंडियाची व्होडाफोन 'एम-पेसा पे' सुविधा
See all

लोअर परळ - व्यापारी आणि दुकानदारांना ग्राहकांकडून रोख स्वरूपातील रकमेच्या व्यवहाराविना पैसे स्वीकारता यावेत, याकरिता व्होडाफोन इंडियानं लोअर परळ येथील सेंट रेगीस हॉटेल येथे व्होडाफोन 'एम-पेसा पे' या सुविधेची घोषणा केलीय. व्होडाफोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील सूद यांनी ही घोषणा केली.

सदर सुविधेद्वारे त्यांना डिजिटल माध्यमातून सुलभ पद्धतीने पैसे स्वीकारता येतील. ही सुविधा वापरण्यासाठी व्यापारी आणि दुकानदारांना व्होडाफोन 'एम-पेसा पे' हे अॅप डाउनलोड करावे लागेल. तसेच ‘व्होडाफोन एम-पेसा पे’ साठी व्यापारी म्हणून नोंदणी करावी लागेल. एकदा नोंदणी केल्यानंतर त्या ग्राहकांना त्यांचे देयक भरण्यासाठी अधिसूचित करता येईल. ग्राहकांना नोटीफिकेशनवर क्लिक करून आपल्या एम-पेसा पे या डिजिटल बटव्यातून किंवा बँक खाते वा डेबिट - क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरता येतील. व्यापारी, दुकानदार आणि ग्राहकांनी देयके देण्या-घेण्यासाठी ‘व्होडाफोन एम-पेसा पे’ चा प्राधान्याने वापर करावा, यासाठी व्होडाफोनतर्फे देशभरात प्रशिक्षण मोहीम हाती घेण्यात आलीय. शहरी तसेच ग्रामीण भागांतील दुकानदार आणि ग्राहकांमध्ये ‘व्होडाफोन एम-पेसा पे’ चा वापर वाढावा, याकरिता व्होडाफोन आपल्या देशभरातील दूरसंचार वितरण जाळ्याचा उपयोग करत आहे. तर व्होडाफोन 'एम-पेसा पे' ने अनेक सरकारी उपक्रम तसेच विकासात्मक संस्थांच्या सहकार्यानं भारतात अनेक डिजिटल पेमेंट योजना सुरू केल्या आहेत. व्होडाफोन 'एम-पेसा पे' या डिजिटल बटव्याच्या वापरकर्त्यांना देयके भरताना, खरेदी करताना किंवा अन्य काही निवडक व्यवहार करताना काही लाभही मिळतात. नव्या ग्राहकांना तीन महिन्यांपर्यंत जास्तीत जास्त 5 टक्के कॅशबॅक सवलत मिळते, तर shopclues.com यावरून खरेदी केलेल्या काही निवडक वस्तूंसाठी 500 रुपये कॅशबॅक मिळते. पेट्रोल खरेदीवर 0.75 टक्के कॅशबॅक आणि काही निवडक मूल्यांच्या व्होडाफोन प्रीपेड पॅकवर पूर्ण टॉक टाइम मिळतो. त्याचप्रमाणे एखाद्या मोबाइल क्रमांकावर पैसे हस्तांतरित करणे आणि ऑनलाइन पद्धतीने – क्रेडिट- डेबिट कार्ड वा इंटरनेट बँकिंगद्वारे बटव्यात पैसे भरणे शक्य आहे.

Loading Comments