Advertisement

Google Plus का झालं बंद? वाचा येथे...


Google Plus का झालं बंद? वाचा येथे...
SHARES

ट्विटर आणि फेसबुकला स्पर्धा देण्यासाठी सात वर्षांपूर्वी सुरू केलेली 'गुगल प्लस' ही सोशल नेटवर्किंग साइट बंद करत असल्याची घोषणा सोमवारी गुगलने केली. अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने ही साइट बंद करत असल्याचं कारण गुगलने दिलं आहे. मात्र या साइटवरून लोकांची गोपनीय माहिती चोरीला जात असल्यानं गुगलने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.


7 वर्षानंतर वेबसाइट बंद

28 जून 2011 रोजी गुगलनेही फेसबुक आणि ट्विटर यां सोशल नेटवर्किंग साइटला स्पर्धा देण्यासाठी गुगल प्लस सुरू केलं. मात्र गुगल प्लसला तितकासा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे 7 वर्षे सुरू असलेली ही साइट सोमवारी गुगलने बंद केली. मात्र या वेबसाइटवरून लाखो लोकांचा डेटा चोरीला गेल्याची माहिती समोर आल्यानं गुगल प्लस बंद झाल्याची माहिती मिळते.


5 लाख लोकांचा डेटा चोरीला

यावर्षी मार्च महिन्यात या वेबसाइटवरून जवळपास 5 लाख लोकांची गोपनीय माहिती अर्थात डेटा चोरीला गेल्याचं गुगलला समजलं. खरंतर 2015 पासूनच ही डेटा चोरी सुरू असल्याचं उघडकीस आल्यानंतर गुगलने सायबर सुरक्षा पथकाची मदत घेतली. त्यानंतर गुगल प्लसवरचा डेटा सुरक्षित असल्याचं गुगलने सांगितलं होतं. मात्र गुगल प्लसवरून होणारी डेटा चोरी काही थांबत नव्हती. त्यामुळेच गुगलने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

मात्र हा डेटा का चोरीला जात होता, यामागे कुणाचा हात होता? याबाबत कोणताही खुलासा गुगलने केलेला नाही. यामुळे गुगल प्लस सुरक्षित आहे का? असा प्रश्न सायबर तज्ज्ञांकडून विचारण्यात येत होतं. मात्र आता गुगलने गुगल प्लस बंद करण्याचा निर्णय घेत या प्रकरणाला पूर्णविराम दिला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा