Advertisement

१ जूनपासून Google Photos साठी मोजावे लागणार पैसे

गुगल फोटोजअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनलिमिटेड फ्री क्लाउड स्टोरेजवर १ जून मंगळवारपासून बंधनं घालण्यात आली आहे.

१ जूनपासून Google Photos साठी मोजावे लागणार पैसे
SHARES

गुगल फोटोजअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनलिमिटेड फ्री क्लाउड स्टोरेजवर १ जूनपासून म्हणजेच १जून मंगळवारपासून बंधनं घालण्यात आली आहे. गुगलनं मागील वर्षीच यासंदर्भातील घोषणा केली होती. गुगल फोटो ड्राइव्ह मॉनेटाइज करण्यात येणार आहे. म्हणजेच शुल्क आकारण्यात येणार आहे. दरम्यान, नव्या नियमांनुसार क्लाउड स्टोरेज सेवेसाठी आता वापरकर्त्यांना पैसे भरावे लागणार आहेत. मंगळवार १ जूनपासून हा नियम लागू होत असून या नवीन नियमामुळं अनेकांना आता आपल्याला गुगल स्टोअरवरील फोटो आणि व्हिडीओ पाहता येणार नाही अशी भीती वाटत आहे. 

ज्या वापरकर्त्यांनी गुगल फोटोवर १५ जीबीपेक्षा कमी मीडिया कंटेंट स्टोअर करुन ठेवला आहे त्यांना चिंता करण्याची गरज नाही. ज्या वापरकर्त्यांनी १५ जीबीपेक्षा अधिक जास्त माहिती गुगल फोटोजच्या माध्यमातून स्टोअर केली असेल त्यांना आता डेटा परत न मिळण्याची चिंता वाटत आहे. मात्र यापैकी अनेकांनी गुगल फोटोजवरील आपले फोटो आणि व्हिडीओ खूप आधीपासूनच डाऊनलोड करुन सेव्ह करण्यास सुरुवात केली आहे.

यामध्ये गुगलच्या सर्व प्रोडक्टसाठी समान वाटप करुन स्पेस उपलब्ध करुन दिली जाईल. यात अगदी फोटोंपासून ईमेलपर्यंत सर्व सेवांचा समावेश असेल. आधीच्या फोटोवर नवीन धोरणांचा काहीच परिणाम होणार नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. १ जूनपासून १५ जीबीपेक्षा अधिक माहिती गुगल फोटोजच्या माध्यमातून सेव्ह करायची असेल तर वापरकर्त्यांना गुगल वन सेवेचं सबक्रिप्शन घ्यावं लागणार आहे.

गुगल वन सबक्रिप्शन प्लॅन

  • गुगल वन सबक्रिप्शन प्लॅननुसार १०० जीबी स्टोरेजसाठी वर्षाला १४९९ रुपये द्यावे लागतील. 
  • वापरकर्त्यांना मासिक शुल्क देण्याचा पर्यायही कंपनीने उपलब्ध करुन दिलाय. 
  • महिन्याला १४९ रुपये भरुन गुगल वनची सेवा घेता येईल. 
  • वापरकर्त्यांना खूप जास्त माहिती गुगल फोटोजवर स्टोअर करुन ठेवायची असेल तर २०० जीबीचा प्लॅन घेता येईल. 
  • यासाठी वर्षाकाठी २१९९ रुपये शुल्क आकारलं जाईल. 
  • २०० जीबी प्लॅनअंतर्गत महिन्याला २१९ रुपये भरुन सेवा घेण्याचा पर्यायही उपलब्ध करुन देण्यात आलाय.
  • २ टीबीच्या वार्षिक प्लॅनअंतर्गत साडेसात हजार रुपये किंवा मासिक ७४९ रुपये सबस्क्रिप्शनची ऑफर गुगलने वापरकर्त्यांना दिलीय.
  • वापरकर्त्यांना १० टीबी स्टोरेजसाठी ३२४९ रुपये, २० टीबीसाठी ६५०० रुपये आणि ३० टीबीसाठी ९७०० रुपयांचा प्लॅनही कंपनीने देऊ केलाय.

गुगलवर लॉगइन करुन one.google.com/storage/management या लिंकच्या माध्यमातून किती स्टोरेज शिल्लक आहे हे वापरकर्त्यांना पाहता येईल.



हेही वाचा - 

मुंबईतील लसीकरणाचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

मुंबईतील मूर्तिकारांसाठी स्वस्त दरात शाडूची माती


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा