Advertisement

गुगलच्या 'त्या' सर्व्हिससाठी मोजावे लागणार पैसे

१ जून २०२१ पासून हाय क्वालिटीमध्ये सेव्ह करण्यात आलेले सर्व नवे फोटो आणि व्हिडीओज गुगल अकाऊंटसह मिळणाऱ्या १५GB स्टोरेज स्पेस किंवा तुम्ही खरेदी केलेल्या अॅडिशनल स्टोरेज स्पेसमध्ये काऊंट केले जातील.

गुगलच्या 'त्या' सर्व्हिससाठी मोजावे लागणार पैसे
SHARES

गुगल फोटोज वापरण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहेत. कंपनीने त्यांच्या सर्व युजर्सना ६ महिन्यांपूर्वी याबाबत एक मेलदेखील पाठवला होता, कंपनीने पाठवलेल्या मेलमध्ये म्हटलं होतं की, तुम्ही गुगल फोटोज अ‍ॅपमध्ये अपलोड केलेले कोणतेही फोटो तुमच्या अकाऊंटसोबत दिलेल्या 15 जीबी स्टोरेज स्पेसमध्ये काऊंट होतील.

१ जून २०२१ पासून हाय क्वालिटीमध्ये सेव्ह करण्यात आलेले सर्व नवे फोटो आणि व्हिडीओज गुगल अकाऊंटसह मिळणाऱ्या १५GB स्टोरेज स्पेस किंवा तुम्ही खरेदी केलेल्या अॅडिशनल स्टोरेज स्पेसमध्ये काऊंट केले जातील. कंपनीने गुगलच्या अन्य सर्व्हिसेस जसे की गुगल ड्राईव्ह आणि जीमेलप्रमाणे गुगल फोटोज स्पेसदेखील काऊंट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुगलची गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेली अनलिमिटेड स्टोरेज ऑफर ३१ मे २०२१ पासून अस्तित्वात नसेल.

जे युजर्स गुगलवर सक्रिय नाहीत, त्यांच्यासाठी हे नवे धोरण आहे. तसेच जे जी-मेल, ड्राईव्हवर (गूगल डॉक्स, शीट्स, स्लाईड, ड्रॉईंग, फॉर्म आणि जॅमबोर्ड फाईल्स) स्टोरेज कपॅसिटीची लिमीट क्रॉस करत आहेत, त्यांच्यासाठीही हे नवे धोरण लागू होणार असल्याचे कंपनीने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.

१ जून २०२१ पूर्वी अपलोड केलेले कोणतेही फोटोज, व्हिडीओज काऊंट केले जाणार नाहीत. दरम्यान, असं म्हटलं जात आहे की, कंपनी त्यांच्या पेड सर्व्हिसेसना वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यादृष्टीने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सध्या कंपनी Google One द्वारे पेड सर्व्हिसेस पुरवत आहे.

१ जून २०२१ पासून हाय क्वालिटीमधील कोणत्याही फाईल्स तुमच्या गुगल अकाऊंटमध्ये स्टोर करत असाल आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही १५ जीबीची लिमिट क्रॉस केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा क्लाऊड स्टोरेजसाठी Google One चं सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल, किंवा फोटोजमध्ये फ्री स्टोरेजसाठी जुना डेटा डिलीट करावा लागेल. गुगल वनचं सब्सक्रिप्शन घेण्यासाठी तुम्हाला दरवर्षी 19.99 डॉलर्स (1467 रुपये) मोजावे लागतील. यामध्ये तुम्हाला 100 जीबी डेटा मिळेल.

कंपनीने पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटलं आहे की, आम्ही हा निर्णय विचार करुन घेतला आहे. हा एक मोठा बदल आहे. परंतु असे बदल करत असताना आम्ही तुम्हालाही यात सामील करुन घेत आहोत. आम्ही तुमच्या मदतीसाठी एक नवं टूल जनरेट करत आहोत. या टूलद्वारे तुम्हाला माहिती मिळत राहील की, तुम्ही किती स्टोरेज स्पेस वापरली आहे. हे टूल तुम्हाला तुमचे फोटोज, व्हिडीओ आणि अन्य कॉन्टेंटच्या बॅकअपच्या हिशेबाने माहिती देत राहील.

सतत अपडेट असलेल्या गुगलने आपल्या ग्राहकांसाठी नवीन पॉलिसी आणण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 जूनपासून ही पॉलिसी लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार दोन वर्षांपासून इनअॅक्टिव्ह असलेले अकाऊंट्स डिलीट करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. ज्या ग्राहकांचे अकाउंट गेल्या दोन वर्षांपासून वापरात नाही. त्यांचे जीमेल आणि गुगल ड्राइव्ह डिलीट होणार असल्याने ग्राहकांचे फोटो, व्हिडीओ आणि महत्त्वाचे मेसेजही डिलीट होणार आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा