Advertisement

गुगल स्मार्टफोन हॅक करून मिळवा ११ कोटी

गुगलच्या स्मार्टफोन पिक्सलमध्ये टायटन एम चीप बसवण्यात आली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन अत्यंत सुरक्षित असल्याचं गुगलचं म्हणणं आहे.

गुगल स्मार्टफोन हॅक करून मिळवा ११ कोटी
SHARES

आपला स्मार्टफोन पिक्सल (Pixel) हॅक करणाऱ्यास गुगल तब्बल १.५ मिलियन डॉलर (१० कोटी ७६ लाख रुपये) चं बक्षीस देणार आहे. गुगलच्या स्मार्टफोन पिक्सलमध्ये टायटन एम चीप बसवण्यात आली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन अत्यंत सुरक्षित असल्याचं गुगलचं म्हणणं आहे. त्यामुळे हा फोन हॅक केल्यास गुगल एवढं मोठं बक्षीस देणार आहे. 

 सध्या टायटन एम हे सर्वात सुरक्षित समजले जाते. टायटन एम स्मार्टफोनमधील सर्वांना सुरक्षा देते. फोनमध्ये बील्ट इन सिक्युरिटी देण्यासाठी टायटन एमला सर्वात जास्त रेटिंग मिळालं आहे. हॅक करणाऱ्यास बक्षीस देण्याबाबत गुगलनं म्हटलं की, संशोधकांनी या फोनमध्ये काहीतरी कमतरता शोधावी यासाठी आम्ही जाणीवपूर्वक  बक्षीस ठेवलं आहे. फोनमध्ये कमतरता शोधल्यास त्या कमरता दूर करून आम्ही ग्राहकांना सर्वात चांगली सेवा देऊ. हे सर्व आम्ही आमच्या ग्राहकांसाठी करत असल्याचं गुगलनं म्हटलं आहे. 

गुगलने अँड्रॉयड व्हर्जन हॅक करणाऱ्यावरही बक्षीस ठेवले आहे.  गुगलने आतापर्यंत १८०० रिपोर्ट्सला बक्षीस दिले आहे. चार वर्षात कंपनीने  ४ मिलियन डॉलरचं बक्षीस दिलं आहे. मागील १२ महिन्यात कंपनीने गुगलच्या सिस्टममध्ये कमतरता शोधणाऱ्यास ११ कोटी रुपयांचा बक्षीस दिलं आहे. 



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा