Advertisement

केंद्र सरकारची Xiaomi च्या ब्राऊजरवर बंदी

Xiaomi नं बनवलेल्या ‘Action Mi Browser Pro - Video Download, Free Fast & Secure’ या ब्राउझरवरही बंदी घातली आहे.

केंद्र सरकारची Xiaomi च्या ब्राऊजरवर बंदी
SHARES

भारतातील चिनी कंपन्यांविरूद्ध कारवाई करत असताना सरकारने Xiaomi नं बनवलेल्या ‘Action Mi Browser Pro - Video Download, Free Fast & Secure’ या ब्राउझरवरही बंदी घातली आहे. गेल्या काही दिवसांत सरकारनं ५९ चिनी अॅप्सवर बंदी घातली होती.

सरकारनं आणखी एक चिनी अॅप QQ इंटरनेशनल ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. Xiaomi नं ब्राउझरविरूद्ध केलेली कारवाई इंटरनेट-वापरणार्‍या डिव्हाइसच्या कार्यावर परिणाम करू शकते. शाओमीनं देशात १०० दशलक्षाहून अधिक स्मार्टफोनची विक्री केली आहे आणि हा आघाडीचा मोबाइल ब्रँड आहे.

चीनमधील दोन लोकप्रिय अ‍ॅप्स Baidu Search आणि Weibo ब्लॉक केले आहे. Baidu Search हे चीनचे स्वत: चे सर्च इंजिन आहे जे गूगलप्रमाणे कार्य करते. तर, Weibo हे चीनचे ट्विटर म्हटले जाते. बॅन केल्यानंतर हे दोन्ही अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अ‍ॅप स्टोअरवरून देखील काढून टाकण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही अ‍ॅप याआधी सरकारनं बॅन केलेल्यांपैकी असावेत.

वीबो हे अ‍ॅप चीनच्या सीना कॉर्पोरेशननं २००९मध्ये सुरूवात केली. वीबोचे जगभरात ५० कोटीहून अधिक युझर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे Weiboच्या एका स्टार युझरपैकी आहे होते. २०१५ मध्ये चीनच्या भेटीपूर्वी मोदींनी चीनच्या या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अकाउंट उघडले होते.

केंद्र सरकार सध्या २७५ अ‍ॅप्सवर नजर ठेवून आहे. हे अ‍ॅप्स नॅशनल सिक्यूरिटी किंवा युझरची माहिती तर लीक करत नाही आहे ना? याची तपासणी केली जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कंपन्याचे सर्व्हर चीनमध्ये आहे, अशा कंपन्यांचे अ‍ॅप्स बॅन केले जाणार आहेत. यात प्रामुख्यानं PUBG Mobile, Ludo World यांचा समावेश आहे.हेही वाचा

Mitron App: 'मित्रों'वर महिन्याभरात ९ अब्ज व्हिडिओची नोंद

चायनीज कचरा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement