दिवसेंदिवस पॉर्न साईट्सचं जाळं इंटरनेटवर पसरत चाललं आहे. सोशल मिडियावर देखील काही सर्फिंग करताना अचानक पॉर्न साईट्सच्या जाहिराती येतात. यामुळे तुम्ही त्रस्त असता. अनेकदा मोबाइल मुलांच्या हातात असतो. अशावेळी त्यांच्याकडून या साईट्स उघडणं जाण्याची किंवा त्यांच्याकडून अशा साईट्स बघण्याची शक्यता अधिक असते. मुलं नेमकी मोबाइलमध्ये काय बघतात? हे देखील कळायला मार्ग नसतो. पण आता यावर एक उपाय सापडला आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा एका अॅपबद्दल सांगणार आहोत. ज्याच्या मदतीनं तुम्ही अशा परिस्थितीपासून वाचू शकता आणि मुलांच्या हातात मोबाइल असल्यावर नजर देखील ठेवू शकता. हे अॅप तुम्हाला अश्लील आणि आपत्तीजनक साईट्सपासून वाचवेल.
तुम्हाला अचानक स्क्रीनवर येणाऱ्या पोर्नोग्राफी, हिंसा, वाईट संदेश यांपासून वाचायचं असेल तर हे अॅप फायदेशीर आहे. या अॅपचं नाव आहे हर हर महादेव. या अॅपच्या मदतीने तुम्ही त्या साईट्सना बंद करू शकता, ज्या तुम्ही क्लिक न करता देखील तुमच्या स्क्रीनवर चालू होतात. ज्या साईट्स तुम्हाला आवडत नाहीत आणि ज्या अश्लील सामग्री दाखवतात, या साईट्सपासून तुम्ही वाचू शकता.
या अॅपला हर-हर महादेव अॅप असे नाव देण्यात आलं आहे. कारण या अॅपच्या मदतीने कोणतीही अश्लील साईट चालू होताच, भक्ती गीते वाजू लागतात. त्यामुळे या अॅपला असं नाव देण्यात आलं आहे. या अॅपचं खास गोष्ट म्हणजे तुम्ही हा अॅप डाऊनलोड केल्यानंतर, जेव्हा तुमच्या स्क्रीनवर काही अश्लील साईट्स चालू होतील, त्याचबरोबर हे अॅपमधून भक्ती संगीत वाजण्यास सुरुवात होईल. या अॅपच्या मदतीने वेबसाईट ब्लॉक करता येऊ शकतात. हे अॅप एकाप्रकारे इंटरनेट फिल्टरिंगचे काम करेल. या अॅपला बनवण्यासाठी जवळपास ६ महिने एवढा वेळ लागला. या अॅपच्या मदतीनं जवळपास ३८०० साइट्स ब्लॉक करता येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही अशा साईट्सच्या येणाऱ्या जाहिरातींपासून वैतागला असाल तर हे अप नक्की डाऊनलोड करा.