व्हॉट्स अॅपकडे तुमची कोणती खाजगी माहिती आहे? हे जाणून घ्या


SHARE

तुमच्या खाजगी माहितीवर फेसबुकची नजर आहे, हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे. पण तुम्हाला हे माहीत आहे का? फक्त फेसबुकच नाही, तर व्हॉट्स अॅपची देखील तुमच्या खाजगी माहितीवर नजर असते. तुम्ही म्हणाल व्हॉट्स अॅपचं end-to-end encrypted फिचर आहे ज्यामुळे आमचे मॅसेज कुणी वाचू शकत नाही. पण हा तुमचा गैरसमज आहे.

तुमचा कितीही व्हॉट्स अपवर विश्वास असला तरी तुमची खाजगी माहिती व्हॉट्स अॅपकडे साठवली जाते हेही तितकंच खरं आहे. पण आपल्या सर्वांचं सुदैवंच म्हणावं लागेल की, आपली कोणती माहिती व्हॉट्स अॅपकडे आहे पाहता येऊ शकते. पण कसं? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहेत.


१) सुरुवातीला व्हॉट्स अॅप ओपन करा. व्हॉट्स अॅपच्या सेटिंग सेक्शनमध्ये जा.

२) तिथे अकाऊंट (Account) लिहलेलं दिसेल. त्यावर क्लिक करा.

३) त्यानंतर रिक्वेस्ट अकाऊंट (Request account info) वर क्लिक करा.

४) तुमच्या समोर आलेल्या रिक्वेस्ट रिपोर्ट (Request Report) या पर्यायावर क्लिक करा. त्यावर तुम्हाला एक तारीख दिली जाईल. त्या तारखेपर्यंत तुम्हाला पूर्ण रिपोर्ट पाठवला जाईल.

५) तुम्हाला ३ दिवसात झिप फाईलमधये ही माहिती उपलब्ध होईल.

६) व्हॉट्स अपकडे असलेली तुमची सर्व माहिती जसं की मेसेजेस, फोटो, मोबाईल नंबर, संपर्क, ग्रुपची माहिती.

७) फक्त एक गोष्ट करायची नाही ती म्हणजे ३ दिवस व्हॉट्स अॅप नंबर बदलायचा नाही. नाहीतर रिपोर्ट रद्द होतो.

८) तुम्ही मागवलेला हा रिपोर्ट ३० दिवसांनी डिलिट केला जातो. ३० दिवसांच्या आत झिप फाईल डाऊनलोड करणं आवश्यक आहे.

९) डाऊनलोड केलेल्या झिप फाईलमधील सर्वच माहिती ओपन होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्या अॅपची गरज लागू शकते.   हेही वाचा

आता आपल्या मर्जीनुसार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी व्हा

आधार कार्ड हरवलंय? नॉट टू वरीसंबंधित विषय
ताज्या बातम्या