Advertisement

आता आपल्या मर्जीनुसार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी व्हा

आता व्हॉट्सअ‍ॅपनं ग्रुपसाठी नवं फिचर आणलं आहे. यामुळं एखाद्या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं अथवा नाही याचा निर्णय युजरच्या हातातच असेल.

आता आपल्या मर्जीनुसार व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सहभागी व्हा
SHARES

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या अ‍ॅपनं सध्या नवनवीन फीचर्स आणण्याचा धडाकाच लावला आहे. यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपनं फेक न्यूजला आळा घालण्यासाठी एक नवं फिचर आणलं. तर दुसरीकडे एक मेसेज किती वेळा फॉरवर्ड करण्यात आलाय हे पाहण्यासाठीही एक फिचर अ‍ॅड केलं होतं. मात्र, आता व्हॉट्सअ‍ॅपनं ग्रुपसाठी नवं फिचर आणलं आहे. यामुळं एखाद्या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं अथवा नाही याचा निर्णय युजरच्या हातातच असेल.


परवानगी आवश्यक

यापूर्वी युजरला एखाद्या ग्रुपमध्ये सहभागी करण्याचे सर्व अधिकार ग्रुपच्या अ‍ॅडमिनकडे होते. अ‍ॅडमिननं ग्रुपमध्ये अ‍ॅड केल्यानंतर केवळ त्या ग्रुपमधून बाहेर पडण्याचे अधिकार संबंधित व्यक्तीकडे होते. परंतु आता कोणत्या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं याचा हे पूर्णपणे संबंधित व्यक्तीलाच ठरवता येणार आहे. एखाद्या ग्रुपमध्ये एखाद्या व्यक्तीला अ‍ॅड करायचं झाल्यास, संबंधित ग्रुपच्या अ‍ॅडमिनला त्यासाठी आधी अ‍ॅड करण्यात येणार असलेल्या व्यक्तीची परवानगी घ्यावी लागणार आहे.


रिक्वेस्ट पाठवावी लागणार

एखाद्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यापूर्वी ग्रुपच्या अ‍ॅडमिनला संबंधित व्यक्तीला खाजगीमध्ये एक रिक्वेस्ट पाठवावी लागणार आहे. याद्वारे संबंधित व्यक्तीकडे परवानगी मागितली जाईल आणि जर त्या व्यक्तीनं ती रिक्वेस्ट स्वीकारल्यास ती व्यक्ती ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकेल. तसंच यासाठी तीन दिवसांची मुदत मिळणार असून तीन दिवसांमध्ये रिक्वेस्ट न स्वीकारल्यास ती एक्सपायर होईल.




हेही वाचा -

आता शूजही अल्ट्रा‘स्मार्ट’

इन्स्टाग्रामवर येणार ‘हे’ नवं फिचर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा