माता आणि बाळासाठी आरोग्य शिक्षण नेटवर्क

 Lower Parel
माता आणि बाळासाठी आरोग्य शिक्षण नेटवर्क
माता आणि बाळासाठी आरोग्य शिक्षण नेटवर्क
माता आणि बाळासाठी आरोग्य शिक्षण नेटवर्क
See all

लोअर परळ - मातेच्या आणि बाळाच्या आरोग्यसंवर्धनाचा प्रसार करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून इंडियन अॅकेडमी ऑफ पीडिअॅट्रिशिअन्स (आयएपी) ही संस्था जगातील पहिलंवहिलं आरोग्य शिक्षण नेटवर्क सुरू करणार आहे. या संस्थेनं 14 डिसेंबरला वरळी येथील फोर सिजन हॉटेलच्या सभागृहात त्याची घोषणा केली. या वेळी भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्ता शायना एनसी, आयएपीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग उपस्थित होते.

“मुलांना निरोगी ठेवणे हे आयएपीचं उद्दिष्ट आहे. यासाठी याआधी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यात इम्युनाइझ इंडिया आणि पोषण यांचा समावेश आहे आणि आता आयएपी - टीव्ही सादर करत आहोत. असं आयएपीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोद जोग म्हणाले.

Loading Comments