Advertisement

व्हॉट्सअॅपला टक्कर देणार नवं अॅप 'इंडियन मेसेंजर'


SHARES

मुंबई - व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट, वायबर असे अनेक अॅप प्ले स्टोरवर आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, अजूनही कोणत्याच अॅपने व्हॉट्सअॅप या अॅपला टक्कर दिली नाही. पण, आता बाजारात एक असं अॅप आलंय ज्यात अनेक वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत. इंडियन मेसेंजर नावाच्या या अॅपची निर्मिती बहादुरसिंह जाडेजा यांनी केलीय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाच्याही मदतीशिवाय बहादुरसिंह यांनी हे अॅप बनवलंय.

तसंच हे अॅप पूर्णपणे भारतीय आहे. या अॅपमध्ये असे काही फीचर्स आहेत जे तुम्हाला फार आवडतील. अॅपमध्ये असलेल्या ग्रुप मेंबर्सवर कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. अॅपद्वारे एकाचवेळी कोणत्याही प्रकारच्या 40 फाईल्स आपण पाठवू शकता. अॅप मध्ये पाठवणाऱ्या मॅसेजच्या संख्येवरही मर्यादा नाही. तसंच तुम्ही आपलं स्टेटस आणि लोकेशन हाईड करु शकता. तसंच अॅपद्वारे स्वत:ची माहिती ही तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर ठेवू शकता. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने अॅपमध्ये एमटी प्रोटो नावाचा प्रोटोकॉल वापरला गेलाय. प्ले स्टोरच्या माहितीनुसार आतापर्यंत या अॅपचे एक लाख डाऊनलोड केले गेले आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा