विज्ञान व्याख्यानमालेचे आयोजन

 Vidhan Bhavan
विज्ञान व्याख्यानमालेचे आयोजन

नरिमन पॉईंट - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्रातल्या रंगस्वर सभागृहात विज्ञान व्याख्यान मालेचं आयोजन करण्यात आलंय. 'द फिफ्थ फोर्स' पाचवी शक्ती या विषयावर गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आलंय.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय. गुरुत्वाकर्षण शक्ती, चुंबकीय शक्ती, तीव्र अणुशक्ती, आणि सौम्य अणुशक्ती या चार प्रकारच्या शक्ती सर्वांना माहित आहेत. पण पाचवी शक्ती अस्तित्वात असल्याचे पुरावे हाती येत आहेत. हीच पाचवी शक्ती हा सदर व्याख्यानाचा विषय आहे.

Loading Comments 

Related News from तंत्रज्ञान