Advertisement

व्हॉट्स अॅपच्या मदतीनं बनवा स्वत:चा स्टिकर्स


व्हॉट्स अॅपच्या मदतीनं बनवा स्वत:चा स्टिकर्स
SHARES

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपनं स्टिकर्सचं नवीन फिचर सुरू केलं आहे. यामुळे तुम्ही आता व्हॉट्सअॅपवर स्टिकर्स पाठवू शकता. पण तुम्हाला माहित आहे का? की तुम्ही तुमचा फोटो देखील स्टिकर्स रुपात कन्वर्ट होऊ शकतो. पण कसं? असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर या आहेत त्यासाठी या सोप्या स्टेप्स. या स्टेप्स फॉलो करा आणि तुमचा स्वत:च्या फोटोचा एक स्टिकर बनवा.


लेटेस्ट व्हर्जन आवश्यक

ज्या फोटोला स्टीकर बनवू इच्छिता त्या फोटोला बॅकग्राऊंड नसावं. यासाठी तुम्हाला फोटो 'नो बॅकग्राऊंड इमेज'मध्ये कन्वर्ट करावा लागेल. त्यानंतर कन्वर्ट केलेला फोटो किंवा इमेज व्हॉट्स अॅप स्टिकर्सच्या लिस्टमध्ये अपलोड करा. त्याचबरोबर फोनमध्ये व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट व्हर्जन किंवा 2.18 किंवा त्यावरील व्हर्जन इंस्टॉल असणं गरजेचं आहे.


असा बनवा स्वत:चा स्टिकर

  • सर्वप्रथम फोनमधील ज्या फोटोचे स्टिकर बनवायचे आहे तो फोटो सिलेक्ट करा.
  • मग तो फोटो PNG फाईलमध्ये कन्वर्ट करा. म्हणजेच त्याचे बॅकग्राऊंट रिमूव्ह करा.
  • त्यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोरवरून बॅकग्राऊंड इरेजर अॅप डाऊनलोड करु शकता. मात्र वेरिफाईड अॅपच इंस्टॉल करा.
  • बॅकग्राऊंड इरेजर अॅप इंस्टॉल केल्यानंतर तुम्ही सिलेक्ट केलेला फोटो अपलोड करा आणि त्याचे बॅकग्राऊंड रिमूव्ह करुन PNG टाईप फाईल फॉर्मेटमध्ये सेव्ह करा.
  • यानंतर पुन्हा गुगल प्ले स्टोरमध्ये जाऊन पर्सनल स्टिकर्स फॉर व्हॉट्सअॅपच्या लिस्टमध्ये वेरिफाईड अॅप डाऊनलोड करा.
  • यानंतर या अॅपमध्ये जावून कन्वर्ट केलेला फोटो अपलोड करा. तुमचा फोटो स्टिकरमध्ये कन्वर्ट होईल. मग तुम्ही व्हॉट्सअॅपवरून शेअर करु शकता.



हेही वाचा

फुड पॅकेटवर असणारा बारकोड 'असा' काम करतो

'या' ७ कारणांमुळे मोबाईलची बॅटरी लवकर संपते




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा