Advertisement

मुंबईतील विद्यार्थीनीनं साकारलं बालदिनाचं गुगल डुडल


मुंबईतील विद्यार्थीनीनं साकारलं बालदिनाचं गुगल डुडल
SHARES

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्तानं गुगलनं डुडलच्या माध्यमातून शुभेच्छा देणारं गुगल डुडलं तयार केलं आहे. विशेष म्हणजे हे डुडल मुंबईतील जे. बी. वाच्छा शाळेत शिकणाऱ्या पिंगला राहुल मोरे या मराठमोळ्या विद्यार्थीनीनं तयार केलं आहे.


७५ हजार विद्यार्थी सहभागी 

काही दिवसांपूर्वी गुगलनं 'मला प्रेरणा देणारी गोष्ट' या विषयावर गुगल डुडल बनवण्यासाठी स्पर्धेचं आयोजन केलं होत. या स्पर्धेत देशभरातील तब्बल ७५ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांपैकी मुंबईतील जे. बी. वाच्छा शाळेत शिकणाऱ्या पिंगला राहुल या विद्यार्थीनीनं या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावलं आहे. पिंगला राहुल मोरे या विद्यार्थिनीनं साकारलेलं डुडल गुगलच्या होमपेजवर बालदिनानिमित्तानं झळकलं असून पूर्ण दिवसभर गुगलच्या वेबसाईटवर हे डुडल पाहाता येणार आहे.


काय आहे डुडलमध्ये?

पिंगलानं साकारलेल्या या डुडलमध्ये आकाशगंगा, ग्रह, तारे, अवकाश यान, सप्तर्षी यासोबतचं आपल्या जिज्ञासू वृत्तीनं या सर्व गोष्टीचं निरीक्षण करणारी लहान मुलगी दिसत आहे. या डुडलनुसार पिंगलानं तिला अंतराळाविषयी असलेलं आकर्षण त्याशिवाय अंतराळातील भव्य दिव्य गोष्टींकडून मिळणारी प्रेरणा यात तिनं साकारली आहे. विशेष म्हणजे अंतराळातील या प्रतिकात्मक गोष्टींचा वापर करून तिनं गुगलचं लोगोही तयार केला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा