Advertisement

व्हॉट्सअॅपचं हे नवं फीचर ग्रुपसाठी महत्त्वाचं!

नुकतंच व्हॉट्सअॅपने मोबाईल अॅप्लिकेशनचं नवं व्हर्जन लाँच केलं आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रुप डिस्क्रिप्शनचं फीचर टाकण्यात आलं आहे. व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेटमध्ये तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आता नावाप्रमाणेच तुम्हाला डिस्क्रिप्शनही अॅड करता येणार आहे.

व्हॉट्सअॅपचं हे नवं फीचर ग्रुपसाठी महत्त्वाचं!
SHARES

जगभरातले बहुतेक नेटकरी वापरत असलेलं मेसेजिंग अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. मोफत मेसेजेस सोबतच मोफत व्हिडिओ कॉलिंगचीही सुविधा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पुरवली जाते. याव्यतिरिक्त अनेक वेगवेगळे 'युजर फ्रेंडली' फीचर्स व्हॉट्सअॅपकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातच आता आणखी एका फीचरची भर पडली आहे.


नवं व्हर्जन, नवं फीचर!

नुकतंच व्हॉट्सअॅपने मोबाईल अॅप्लिकेशनचं नवं व्हर्जन लाँच केलं आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रुप डिस्क्रिप्शनचं फीचर टाकण्यात आलं आहे. तुमच्याकडे अनेक प्रकारचे व्हॉट्सअॅप ग्रुप असतात. मात्र, हे ग्रुप तुम्ही फक्त नावानेच ओळखता. शिवाय, नव्या व्यक्तीला ग्रुपमध्ये अॅड करण्याआधी त्या व्यक्तीला ग्रुपबद्दल सर्व माहिती सांगावी लागते. आता त्याची आवश्यकता भासणार नाही.



ग्रुप डिस्कशनसाठी ग्रुप डिस्क्रिप्शन!

व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेटमध्ये तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आता नावाप्रमाणेच तुम्हाला डिस्क्रिप्शनही अॅड करता येणार आहे. त्यामुळे तो ग्रुप नक्की कशासाठी बनवण्यात आला आहे? त्या ग्रुपचा हेतू काय? याची माहिती तुम्ही डिस्क्रिप्शनच्या जागेमध्ये लिहू शकता!


ग्रुप इन्व्हिटेशनवरही दिसणार डिस्क्रिप्शन!

तुम्ही ग्रुपसाठी टाकलेलं डिस्क्रिप्शन हे तुम्ही पाठवत असलेल्या त्या ग्रुपच्या इन्व्हिटेशनच्या लिंकवरही दिसेल. त्यामुळे इन्व्हिटेशन पाठवलेल्या व्यक्तीला हा ग्रुप नक्की काय आहे, हे तुम्हाला सांगत बसण्याची आवश्यकता नाही.


व्हॉइस कॉल टू व्हिडिओ कॉल

नव्या अपडेटमध्ये तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या व्हॉइस कॉलवरून थेट व्हिडिओ कॉलवर शिफ्ट होता येणार आहे. यासाठी सुरू असलेला व्हॉइस कॉल डिस्कनेक्ट करण्याची काहीही आवश्यकता नाही. चालू कॉलमध्येच फक्च व्हिडिओ कॉलच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचा व्हिडिओ कॉल थेट सुरू होईल.

तर मग वाट कसली पाहाताय? व्हॉट्सअॅपचं नवीन अपडेट लगेच डाऊनलोड करा..आणि हे नवे फीचर्स वापरायला सुरूवात करा!



हेही वाचा

व्हॉट्सअॅप झालं डाऊन, जगभरातील युजर्समध्ये गोंधळ!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा