Advertisement

भारतात २ दमदार 5G स्मार्टफोन लाँच, पण...

Realme आणि Vivo असे दोन 5G स्मार्टफोन लाँच झाला आहे. पण 5G कनेक्टिविटी भारतात सुरू होण्यासाठी युझर्सना प्रतिक्षा करावी लागणार आहे.

भारतात २ दमदार 5G स्मार्टफोन लाँच, पण...
SHARES

आतापर्यंत आपण4G मोबाईल आणि 4G नेटवर्कचा वापर करतो. पण आता बाजारात 5G मोबाईल उपलब्ध झाले आहेत. Realme आणि Vivo या दोन बड्या कंपन्यांनी भारतात 5G मोबाईल लाँच केले आहेत. चीन बनावटीचा Realme X50 Pro 5G भारतात सोमवारी लॉन्च झाला. तर त्याच्या तोडीस तोड म्हणून Vivo कंपनीनं iQoo 3 असा 5G मोबाईल मंगळवारी लाँच केला आहे. दोन्ही मोबाईल 5G असले तरी त्याचं बनावट आणि फिचर पूर्णपणे वेगळे आहेत. आम्ही तुम्हाला दोन्ही मोबाईलच्या फिचर्सची माहिती देणार आहोत. 

Realme X50 Pro 5G ची खासियत

  • Realme X50 Pro 5G या स्मार्टफोनचा RAM 12 GB असून इंटरनल मेमरी 256 GB आहे.
  • स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसर देण्यात आलाय
  • Dual Mode 5G सपोर्ट या फोनमध्ये देण्यात आलाय.
  • अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार हा मोबाईल आहे.
  • फोनमध्ये ६५ वॅटची सुपर डर्ट चार्ज टेक्नोलॉजी देण्यात आली आहे.
  • आता पर्यंतच्या Realme कंपनीचा हा सर्वात महागडा फोन असणार आहे. भारतात याची किंमत 49 हजारांच्या घरात आहे.
  • फोनमध्ये 6 कॅमेर असून यात 64 मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप असणार आहे. सेल्फी कॅमेरा हा ३२ मेगापिक्सलचा असून ड्युअल आहे.
  • रियलमी एक्स२ प्रो मध्ये २०एक्स हायब्रिड झूम फीचर दिलं गेलंय.
  • रस्ट रेड आणि मॉस ग्रीन हे कलर या फोनमध्ये ग्राहकांना उपलब्ध झाले आहेत.

iQoo 3 स्मार्टफोन कंपनीनं खास वैशिष्ट्यांसह लाँच केला आहे. Realme X50 Pro नंतर लाँच होणारा हा भारतातील दुसरा 5G स्मार्टफोन आहे


Vivo कंपनीनं iQoo 3 ची खासियत

  • डिव्हाइसमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप व्यतिरिक्त सुपर एमोलेड 'पोलर व्ह्यू डिस्प्ले' दिला जाईल. हा स्मार्टफोन मोठ्या श्रेणीतील रियलमी आणि शाओमी डिव्हाइससह स्पर्धा करेल.
  • मोबाईलमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले आहे. ज्याचं रिझोल्यूशन 1080X2400 पिक्सल आहे
  • मोबाईलमध्ये २.८४ गीगाहर्ट्झ ऑक्टाकोर प्रोसेसर आणि क्वालकॉमचा नवीनतम आणि सर्वात शक्तिशाली स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट आहे.
  • स्मार्टफोनमध्ये ६ जीबी, ८ जीबी आणि १२ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेज आहे
  • स्मार्टफोनमध्ये 4440mAh बॅटरी आहे आणि कार्बन फाइबर व्हीसी लिक्विड कूलिंग तंत्रज्ञान आहे
  • ४८ मेघापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. तर १६ मेघापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे
  • कंपनीनं हा स्मार्टफोन टॉरनाडो ब्लॅक, क्वांटम सिल्व्हर आणि व्होल्केनो ऑरेंज या तीन रंगांमध्ये बाजारात आणला आहे
  • सुरुवातीची किंमत ३६ हजार ९९० रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज ४ जी व्हेरिएंटची किंमत आहे. २५६ जीबी स्टोरेजसह दुसरा ८ जीबी रॅम आणि 4G व्हेरिएंट ३९ हजार ९९० रुपयांमध्ये खरेदी करता येईल. त्याचबरोबर, १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह टॉप 5G व्हेरिएंटची किंमत ४४ हजार ९९० रुपये आहे.

Realme आणि Vivo असे दोन 5G स्मार्टफोन लाँच झाला आहे. पण 5G कनेक्टिविटी भारतात सुरू होण्यासाठी युझर्सना प्रतिक्षा करावी लागणार आहे. मात्र हा फोन भारतात येण्याआधीच ग्राहकांनी त्याची बुकींग सुरू केलीय

 


हेही वाचा

आयफोन युझर्सच्या व्हाॅट्सअॅपवर लवकरच डार्क मोड

मुलांनो TikTok वर होताय 'आऊट ऑफ कंट्रोल', आता पालक करणार कंट्रोल

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा