ट्वीटर अनेक अकाउंट्स बंद करणार, 'हे' आहे कारण

युजर्सना उत्तम सेवा देण्यावर आमचा भर असल्याने इनअॅक्टिव्ह युजर्सचे अकाउंट्स बंद करणार असल्याचं ट्वीटरच्या प्रवक्त्यानं म्हटलंय.

SHARE

 ट्वीटर (twitter) आता अनेक अकाउंट्स बंद करणार आहे. मागील ६ महिन्यांपासून साइन इन न केलेले अकाउंट्स बंद करणार असल्याचा इशारा ट्वीटर ने दिला आहे. तसा ई-मेलही ट्वीटरने आपल्या  इनअॅक्टिव्ह युजर्सना पाठवला आहे. युजर्सनी ११ डिसेंबरपर्यंत साइन इन न केल्यास त्यांचे अकाउंट बंद केले जाईल, असा इशारा ट्वीटरने  ई-मेलमधून दिला आहे. 

बंद केलेल्या अकाउंटचे 'युजर नेम' ट्वीटर दुसऱ्यांना उपलब्ध करून देणार आहे.  युजर्सना उत्तम सेवा देण्यावर आमचा भर असल्याने इनअॅक्टिव्ह युजर्सचे अकाउंट्स बंद करणार असल्याचं ट्वीटरच्या प्रवक्त्यानं म्हटलंय. अकाउंट्स बंद करण्याची प्रक्रियाकाही महिन्यांमध्ये पूर्ण होईल, असं ट्वीटरने म्हटलंय.  इनअॅक्टिव्ह युजर्सना सूचना देणारे ईमेल ट्वीटरने पाठवण्यास सुरुवात केली आहे.  पण अकाउंट बंद करण्याची तारीख ट्वीटरने जाहीर केलेली नाही. अकाउंट बंद करण्यापूर्वी अशा युजर्सना मेल पाठवून कळवण्यात येणार आहे. 

ट्वीटर २०२० मध्ये नवीन फिचर्स आणणार आहे. 'रिट्वीट' आणि 'मेन्शन्स'वरील फिचर्स आणखी विकसित केले जाणार आहेत. ट्वीट कुणी रिट्वीट केल्यास आणि मेन्शन्स डिसेबल करण्याचे फिचर्स आणण्याचा विचार सुरू आहे. यामुळे सोशल मीडियावरील छळाला आळा घालता येऊ शकेल, असं ट्वीटरचं म्हणणं आहे. हेही वाचा -

गुगलची 'ही' सेवा लवकरच होणार बंद

गुगल स्मार्टफोन हॅक करून मिळवा ११ कोटी
संबंधित विषय
ताज्या बातम्या