Advertisement

अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचं निधन

धबधब्याखाली आंघोळ करणारी लिरिल गर्ल, हमारा बजाज, सर्फ, चेरी ब्लॉसम, शू पॉलिस, एमआरएफ मसल मॅन, लिरील गर्ल, कामसूत्र कपल, फेअर अँड लव्हली अशा अनेक लोकप्रिय जाहिराती त्यांनी केल्या आहेत. अॅलेक पदमसी यांच्या जाण्यानं जाहिरात क्षेत्रातील मोठं नावं काळाच्या पडद्याआड गेलं आहे.

अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचं निधन
SHARES

जाहिरात क्षेत्रातील मोठं नाव असलेले अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचं शनिवारी निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २००० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.


जाहिरातक्षेत्रातील बापमाणूस

पदमसी यांना आधुनिक भारतीय जाहिरात जगातील बापमाणूस मानलं जातं. त्यांनी लिंटास नावाच्या प्रसिद्ध जाहिरात कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीद्वारे त्यांनी अनेक लोकप्रिय जाहिराती बनवल्या. अनेक वर्ष ही कंपनी भारतातील पहिल्या क्रमांकाची जाहिरात कंपनी म्हणून ओळखली जात होती. 

त्यांनी १०० हून अधिक ब्रँड नावारूपालाआणले. पदमसी १४ वर्षे या कंपनीचे सीईओ म्हणून कार्यरत होते. केवळ भारतातच नाही, तर परदेशातही आपलं नाणं खणखणतीपणे वाजवलं. जाहिरात क्षेत्रातील आॅस्कर अशी ओळख असलेल्या 'सीलिओ हाॅल आॅफ फेम' पुरस्कारासाठीही त्यांना नामांकन मिळालं होतं.


 लोकप्रिय जाहिराती

धबधब्याखाली आंघोळ करणारी लिरिल गर्ल, हमारा बजाज, सर्फ, चेरी ब्लॉसम, शू पॉलिस, एमआरएफ मसल मॅन, लिरील गर्ल, कामसूत्र कपल, फेअर अँड लव्हली अशा अनेक लोकप्रिय जाहिराती त्यांनी केल्या आहेत. अॅलेक पदमसी यांच्या जाण्यानं जाहिरात क्षेत्रातील मोठं नावं काळाच्या पडद्याआड गेलं आहे.

वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी मर्चंट ऑफ व्हेनिस या नाटकातून अॅलेक पदमसी यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले. आत्तापर्यंत त्यांनी सत्तर नाटकं केली आहेत. त्यात इंग्रजी आणि हिंदी नाटकांचा समावेश आहे. त्याशिवाय जाहिरात आणि सिने क्षेत्रातही आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवला आहे. ‘गांधी’ या सिनेमात त्यांनी बॅ. जिना यांची भूमिका साकारली होती. शेक्सपिअर आर्थर मिलर, प्रताप शर्मा, गिरीश कार्नाड, विजय तेंडुलकर, इस्मत चुगताई अशा नाटककारांची नाटकेही त्यांनी केली आहेत.



हेही वाचा-
तनुश्रीचे सर्व आरोप बिनबुडाचे, खोटे; नानाच्या वकिलांचं महिला आयोगाकडे लेखी उत्तर
जबरदस्त शैलीत 'मुळशी पॅटर्न'चा खतरनाक ट्रेलर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा