येत्या रविवारी मेगा ब्लॉकमुळे (Mega block) रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत होणार आहे. पश्चिम रेल्वेवर (western railway) सांताक्रूझ आणि गोरेगाव (goregaon) स्थानकांदरम्यान पाच तासांचा जम्बो ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
या पाच तासांच्या जम्बो ब्लॉकमध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरील सर्व जलद गाड्या गोरेगाव ते सांताक्रूझ (santacruz) दरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जातील. याशिवाय अनेक उपनगरीय गाड्या रद्द केल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी आणि गैरसोय होण्याची शक्यता आहे.
7 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत अप आणि डाउन अशा दोन्ही जलद मार्गांवर हा ब्लॉक असणार आहे. या पाच तासांच्या ब्लॉगमध्ये अनेक काम केली जाणार आहेत.
महत्त्वाचे ट्रॅक, ओव्हरहेड इक्विपमेंट, सिग्नल देखभालीची कामं केली जाणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहेत. लोकल ट्रेन, रेल्वेच्या सुरक्षित नेटवर्कसाठी ही कामं महत्त्वाची असल्याने ब्लॉग घेत असल्याचं ते म्हणाले.
लोकांची गैरसोय होत असली, तरी प्रवाशांच्या पुढील गैरसोय कमी करण्यासाठी हा हा ब्लॉक आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.
7 सप्टेंबर रोजी सांताक्रूझ आणि गोरेगावदरम्यान पाच तासांच्या ब्लॉकवेळी जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवल्या जातील. यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी अधिक वेळ लागू शकतो. प्रवाशांनी त्यांची गैरसोय टाळण्यासाठी त्यानुसार आपल्या प्रवासाचं नियोजन करण्याचा सल्ला रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.
7 सप्टेंबर रोजी सांताक्रूझ आणि गोरेगावदरम्यान पाच तासांच्या ब्लॉकवेळी जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवल्या जातील. यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी अधिक वेळ लागू शकतो.
प्रवाशांनी त्यांची गैरसोय टाळण्यासाठी त्यानुसार आपल्या प्रवासाचं नियोजन करण्याचा सल्ला रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा