Advertisement

एक्स्प्रेसवर सुसाट सुटा... ८० किमीपेक्षा कमी वेगाला मनाई

एक्स्प्रेस वेवरून ८० किमी वा त्यापेक्षा अधिक वेगाने गाडी चालवण्याचे निर्बंध घालून देण्यात आले आहे. त्यापेक्षा कमी वेगाने गाडी चालवत असाल, तर गाडी चालवणाऱ्या वाहन चालकाविरोधात वाहतूक पोलिस कारवाई करणार आहेत.

एक्स्प्रेसवर सुसाट सुटा... ८० किमीपेक्षा कमी वेगाला मनाई
SHARES

वाहनचालकांनो, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गाडी चालवत असाल, तर आता तुम्हाला सुसाटच सुटावं लागेलं. कारण एक्स्प्रेस वेवरून ८० किमी वा त्यापेक्षा अधिक वेगाने गाडी चालवण्याचे निर्बंध घालून देण्यात आले आहे. त्यापेक्षा कमी वेगाने गाडी चालवत असाल, तर गाडी चालवणाऱ्या वाहन चालकाविरोधात वाहतूक पोलिस कारवाई करणार आहेत.


अपघात वाढल्याने...

मुळात एक्स्प्रेस वेवर पहिल्यापासूनच किमान ८० किमी वेगाने गाडी चालवणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र या कायद्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. एक्स्प्रेस वेवर वाहनचालक वाटेल त्या वेगाने गाडी चालवतात. कुणी भरधाव वेगानं तर कुणी कमी वेगानं. त्यामुळे गेल्या काही वर्षांत एक्स्प्रेस वेवर अपघातांची संख्या वाढली आहे.



कडक अंमलबजावणी

एक्स्प्रेस वेच्या पहिल्या लेनमध्ये धिम्या गतीनं जाणाऱ्या वाहनांमुळे मागून भरधाव वेगानं येणाऱ्या वाहनांची अडचण होते. परिणामी अपघात होतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी एक्स्प्रेस वेवरील किमान ८० किमी वेगाच्या नियमाचं कडक पालन करण्याचा निर्णय घेतला आहे.


'या' वाहनांना वगळलं

त्यानुसार नुकतीच यासंबंधीची अधिसूचना वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वच वाहनांना एक्स्प्रेस वेवर किमान ८० किमीच्या वेगानं वाहन चालवावचं लागणार आहे. त्याचवेळी अत्यावश्यक सेवा वाहनं, रूग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहनं, पोलिस आणि शासकीय वाहनं यांना वगळ्यात आलं आहे.



हेही वाचा-

सी लिंकचा प्रवास महागणार -१ एप्रिलपासून नवे दर

'हायपर' गर्दीवर 'हायपरलूप'चा उतारा, मुंबई ते पुणे १४ मिनिटांत शक्य



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा