Advertisement

'बेस्ट' बसचा ताफा भविष्यात वाढवण्याची शक्यता


'बेस्ट' बसचा ताफा भविष्यात वाढवण्याची शक्यता
SHARES

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बेस्ट भविष्यात आपल्या ताफ्यातील बस गाड्यांची संख्या वाढवण्याची शक्यता आहे. बेस्ट प्रवाशांसाठी ६००० बसेस सेवेत आणणार आहे. बेस्टनं प्रवासी तिकीट भाड्यात कपात केल्यानंतर प्रवासी संख्यते मोठी वाढ झाली. प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी बेस्ट उपक्रम अनेक प्रयत्न करत आहेत.

बेस्ट उपक्रमाचे महाव्यपस्थापक सुरेंद्र बागडे यांनी याबाबत माहिती दिली असून, २ टप्प्यात बेस्टच्या ताफ्यातील बसची संख्या वाढविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ६००० आणि दुसऱ्या टप्प्यात ही संख्या १० हजारावर नेण्याचं लक्ष्य बेस्टनं ठेवलं आहे. बेस्टच्या ताफ्यात सध्यस्थितीत ३ हजार ५०० बसेस असून, यामध्ये १२० डबल डेकर बस आहेत. बेस्टच्या ताफ्यात २७ बस डेपो, ५१ बस स्थानक आणि ११२ बस टर्मिनल आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मुंबईत लॉकडाऊन करण्यात आलं असून, यामुळं सामान्यांसाठी सेवा बंद होती. परंतुस राज्य सरकारनं ८ जूनपासून मिशन बिगिन अगेन अंतर्गत ही सेवा सुरू केली. बेस्टनं ८२ मार्गावर २ हजार १३२ बसेस सुरू केल्या. 



हेही वाचा -

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा तलाव ओव्हरफ्लो

बेस्टच्या १,५६६ कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा