Advertisement

‘BEST PRAWAS’ बेस्टचं अॅप लॉंच

बेस्टचं बसबाबत माहिती देणारं अॅप लॉंच करण्यात आलं आहे.

‘BEST PRAWAS’ बेस्टचं अॅप लॉंच
SHARES

बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता बसचं नेमकं ठिकाणं कुठं आहे हे समजण्यात मदत होणार आहे. कारण बेस्टचं बसबाबत माहिती देणारं अॅप लॉंच करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बेस्ट उपक्रमाचा 'बेस्ट प्रवास' (BEST PRAWAS) या बस ट्रॅकिंग अॅपचं लोकार्पण केलं.

आयटीएमएस प्रकल्पाचा भाग

कुलाबा येथील बेस्ट भवन इथं हा सोहळा पार पडला असून केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांसह अनेक नेते उपस्थित होते. तसंच, बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. बेस्टचं हे अॅप 'इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम' (आयटीएमएस) या प्रकल्पाचा एक भाग असून, या प्रकल्पाची किंमत ११२ कोटी रुपये आहे.

अनेक पर्याय उपलब्ध

बेस्टच्या या अॅपमध्ये अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत. अॅपमध्ये आपलं ठिकाण टाकल्यास या आपच्या मध्यमातून बस थांब्याची माहिती देण्यात येणार आहे. तसंच, बस मार्गही समजण्यातही मदत होणार आहे. बसचं ठिकाण समजणार आहे. एखादी बस आगारातून किती वाजता निघणार आणि किती वाजता पोहोचणार यासंदर्भात माहिती मिळणार आहे. या अॅपमध्ये जीपीएस प्रणाली असल्यानं वाहतुकीची सध्यस्थिती समजेल. यांसारखे अनेक पर्याय या अॅपमध्ये आहेत.



हेही वाचा -

प्रकल्पबाधीतांचं माहुलमध्ये स्थलांतर अयोग्य

गणपती उत्सवात चोरट्यांचा उच्छाद, चोरीची घटना सीसीटिव्हीत कैद



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा