Advertisement

भाडेकपातीनंतर बेस्टच्या ३ मार्गावर एसी बसेस

बेस्ट उपक्रमानं घेतलेल्या भाडेकपातीच्या निर्णयानंतर बेस्टला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसंच आता प्रवाशांचा प्रवास गारेगार व्हावा यासाठी, एसी बसची संख्या वाढविण्याच्या मागणीचीही दखल घेत बेस्टनं आणखी ३ मार्गांवर एसी बस सेवा सुरू केली आहे.

भाडेकपातीनंतर बेस्टच्या ३ मार्गावर एसी बसेस
SHARES

बेस्ट उपक्रमानं घेतलेल्या भाडेकपातीच्या निर्णयानंतर बेस्टला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसंच आता प्रवाशांचा प्रवास गारेगार व्हावा यासाठी, एसी बसची संख्या वाढविण्याच्या मागणीचीही दखल घेत बेस्टनं आणखी ३ मार्गांवर एसी बस सेवा सुरू केली आहे. बेस्टनं बुधवारी एका, तर गुरुवारी दोन मार्गांवर एसी बससेवा सुरू करण्यात आली. बेस्टकडे एसी बसचा ताफा नसला, तरीही केंद्र सरकारकडून एमएमआरडीएकडं सुपूर्द करण्यात आलेल्या २५ बस बेस्टतर्फे चालवल्या जात आहेत. त्यापैकी ३ एसी बस नव्यानं सेवेत चालविल्या गेल्या आहेत.

किमान तिकीट ६ रुपये

एएस-१७२ ही बससेवा बुधवारपासून पी. एस. कुरणे चौक ते प्लाझा सिनेमा या मार्गावर सुरू करण्यात आली. तर गुरुवारपासून एएस-१ ही एसी बस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते एनसीपीए मार्गावर आणि एएस-८ ही एसी बस वर्ल्ड ट्रेड सेंटर ते चर्चगेट स्थानक या मार्गावर सुरू करण्यात आली. प्रवाशांच्या सुविधेसाठी या तिन्ही बसच्या फेऱ्या २० मिनिटांच्या अंतरानं चालविल्या जात आहेत. तसंच, या प्रवासासाठी किमान तिकीट ६ रुपये आहे.

एसी बससेवेची मागणी

सध्या बेस्टच्या ताफ्यात ३,३३७ बस आहेत. मात्र एसी बससेवा वाढविण्याची मागणी होत आहे. ही मागणी लक्षात घेत बुधवारी एका, तर गुरुवारी दोन मार्गांवर एसी बससेवा सुरू केली आहे. बेस्टनं जुन्या तिकीट दरांच्या तुलनेत बुधवारची तिकीट विक्री आणि प्रवासी संख्येचा आढावा घेतला. त्यामध्ये प्रवासी संख्या २२ लाख ८० हजार झाली असून, उत्पन्नाचा आकडा १ कोटी ४८ लाख ८४ हजार १७४ रुपये इतका नोंदविण्यात आला आहे.हेही वाचा -

वडाळ्यातील विठ्ठल मंदिर यात्रेनिमित्त वाहतूक मार्गात बदल

नाल्यात पडलेल्या २ वर्षीय मुलाचा अद्याप तपास सुरूचRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा