Advertisement

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त बेस्टच्या जादा गाड्या

मुंबईतील विविध भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तूंना भेट देण्याची इच्छा असणाऱ्या प्रवाशांच्या सोयीकरीता बेस्ट उपक्रमाच्यावतीने विशेष बस फेऱ्यांचं आयोजन केलं आहे.

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त बेस्टच्या जादा गाड्या
SHARES

येत्या १४ एप्रिल २०१८ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी येथे मोठ्या प्रमाणात अनुयायी दर्शनासाठी येतात. अनुयायांच्या सोयीकरीता बेस्ट प्रशासनाने खास बससेवेची व्यवस्था केली आहे.


विशेष बस फेऱ्यांचं आयोजन

मुंबईतील विविध भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तूंना भेट देण्याची इच्छा असणाऱ्या प्रवाशांच्या सोयीकरीता बेस्ट उपक्रमाच्यावतीने विशेष बस फेऱ्यांचं आयोजन केलं आहे. शिवाजी पार्क इथून चालविण्यात येणाऱ्या बस सेवेकरीता प्रतिप्रवासी १५० रू प्रवासभाडं आकारण्यात येणार असून सकाळी ८.००, ८.३०, ९.००, ९.३०, १०.०० वा. या फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या विशेष बसफेऱ्यांची तिकीटं चैत्यभूमी, शिवाजी पार्क (बसचौकी), वीर कोतवाल उद्यान (प्लाझा) इथं उपलब्ध करण्यात येणार आहेत.


ओळखपत्राशिवाय तिकीट

तसंच माटुंगा परिसरातील राजगृह व वडाळा परिसरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालय या ठिकाणांना भेट देऊ इच्छिणाऱ्या अनुयायींच्या सोयीकरिता सकाळी ८.०० वाजल्यापासून रात्री १०.०० वाजेपर्यंत वीर कोतवाल उद्यान (प्लाझा) आणि वडाळा आगार दरम्यान दादर स्थानक पूर्व व राजगृह मार्गे बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. १४ एप्रिल ला सार्वजनिक सुट्टी असल्याने RFID कार्ड ओळखपत्राशिवाय दैनंदिन तिकीटाची सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध केली आहे.


रात्रीपर्यंत  मार्गदर्शक

तसंच दैनंदिन तिकीट विक्री व्यवस्था दादर स्टेशन वीर कोतवाल उद्यान शिवाजी पार्क व चैत्यभूमीच्या परिसरात करण्यात आली आहे. तसंच अनुयायींच्या मार्गदर्शनाकरीता शिवाजी पार्क तसेच आजूबाजूच्या परिसरात सकाळी १० ते रात्री उशीरापर्यंत वाहतूक अधिकारी व बस निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



हेही वाचा-

बेस्ट दरवाढीवर शिक्कामोर्तब! मुंबईकरांच्या खिशाला चाट पडणारच!

८ दिवसांत भिडेंना पकडा, नाहीतर..., आंबेडकरांचं सरकारला अल्टिमेटम



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा