Advertisement

मेट्रो-३ च्या रात्रीच्या कामावर स्थगिती कायम


मेट्रो-३ च्या रात्रीच्या कामावर स्थगिती कायम
SHARES

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ च्या नाईट शीफ्टवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवल्याची माहिती याचिकाकर्ते अॅड. राॅबिन जयसिंघानी यांनी दिली. पुढील सुनावणीपर्यंत म्हणजेच १० आॅगस्टपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे.


११ महिन्यांपूर्वीच बंदी

मेट्रो-३ प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) कडून रात्रंदिवस काम केलं जातं होतं. पण या कामादरम्यान वापरण्यात येणाऱ्या मशिनीच्या आवाजामुळं स्थानिकांंना त्रास होऊ लागल्यानं रात्रीच्या वेळेस होणाऱ्या कामाला विरोध होऊ लागला. याविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या. त्यानुसार जयसिंघानी यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान ११ महिन्यांपूर्वी न्यायालयानं रात्रीच्या कामावर बंदी घातली.



'एमएमआरसी'ची मागणी

या बंदीमुळं मेट्रो-३ च्या कामावर परिणाम होत असून 'एमएमआरसी'चं मोठं नुकसानही होत आहे. त्यामुळं या कामावरील बंदी उठवण्याची मागणी 'एमएमआरसी'कडून होत होती. पण न्यायालयानं ही बंदी उठवण्यास नकार देत ही बंदी शुक्रवारीही पुढील सुनावणीपर्यंत कायम ठेवली आहे. याप्रकरणी १० आॅगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.


ध्वनी प्रदूषण तपासणीचे आदेश

दरम्यान रात्रीच्या वेळेस होणाऱ्या कामादरम्यानच्या ध्वनी प्रदूषणाची तपासणी करण्याचे आदेश न्यायालयानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. त्यानुसार ध्वनिप्रदूषणाच्या पातळीचा अहवाल ३ आॅगस्टपर्यंत सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं प्रदूषण मंडळाला दिल्याचंही जयसिंघानी यांनी सांगितलं.



हेही वाचा-

'मेट्रो कामामुळे होणारं ध्वनी प्रदूषण कमी करा', प्रधान सचिवांचे MMRC ला आदेश

मेट्रो-३ घेणार आणखी ७६ झाडांचा बळी!

मेट्रो-३ च्या कामामुळं वरळी नाका महापालिका शाळेला तडे



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा