सप्टेंबरमध्ये मध्य रेल्वे मार्गावर धावणार एसी लोकल?

मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. कारण, प्रवाशांना लवकरच गारेगार प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात मध्य रेल्वे मार्गावर पहिली एसी लोकल धावण्याची शक्यता आहे.

सप्टेंबरमध्ये मध्य रेल्वे मार्गावर धावणार एसी लोकल?
SHARES

मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. कारण, प्रवाशांना लवकरच गारेगार प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात मध्य रेल्वे मार्गावर पहिली एसी लोकल धावण्याची शक्यता आहे. तसंच, या मार्गावरील एसी लोकलचे डबे ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत मिळणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रचंड गर्दीतून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

वेळेचं नियोजन

मध्य रेल्वेवरील एसी लोकल सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या सुमारास सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर धावणार आहे. एसी लोकलचे दरवाजे उघडणं आणि बंद होणं यामधील वेळेचं नियोजन आणि काही तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतरचं ही लोकल सुरू करण्यात येणार आहे. परंतु, जर दार उघडणं आणि बंद होण्याला वेळ जास्त लागत असेल तर ही एसी लोकल हार्बर मार्गावरील गोरेगाव ते पनवेल, गोरेगाव ते सीएसएमटी या मार्गावर वळविण्यात येणार आहे.

वेळेत घट करण्याचे प्रयत्न

मध्य रेल्वेचे एसी लोकलचे दरवाजे उघडणं आणि बंद करणं यातील वेळेत घट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळं इतर लोकलच्या वेळेवर अडचण येणार नाही. सामान्य लोकल ट्रेन नियोजित वेळेत चालविण्यात येणार आहे.हेही वाचा -

चर्चगेट स्थानकावरही स्ट्रक्चरल ऑडिटची वेळ!

कोलकात्यात डॉक्टरांना मारहाण, मुंबईत 'मार्ड'ने पुकारला संपसंबंधित विषय