Advertisement

सर्वच महिला प्रवाशांना प्रथम श्रेणीच्या सुविधा


सर्वच महिला प्रवाशांना प्रथम श्रेणीच्या सुविधा
SHARES

मध्य रेल्वेने महिलांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महिला प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी केला आहे. द्वितीय श्रेणीच्या डब्यांमध्ये प्रथम श्रेणीसारखी सुविधा देत गाद्या असलेली आसनं देण्यात आली आहेत. सध्या दहा गाड्यांमध्ये अशी अासनं बसवण्यात अाली अाहेत. आणखी आठ लोकलमधील महिलांच्या डब्यात अशी अासनं बसवली जाणार अाहेत. 


महिला प्रवाशांची मागणी

मध्य रेल्वे मार्गावरून रोज १४२ लोकलच्या १,७३२ फेऱ्या होतात.  द्वितीय श्रेणीतून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचा प्रवास आरामदायी करा, अशी मागणी महिलांकडून वारंवार केली जात होती. याला प्रतिसाद देत द्वितीय श्रेणीच्या डब्यातील आसनं प्रथम श्रेणीच्या आसनांप्रमाणे करण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता. त्याला काही महिन्यांपूर्वी मंजुरी मिळाली. त्यानुसार सुरुवातीला दहा लोकल गाड्यांच्या द्वितीय श्रेणीच्या महिला डब्यात गाद्यांची आसनं बसवण्यात अाली. यातील एका लोकलची सोमवारी रेल्वे बोर्ड अध्यक्ष अश्विनी लोहाणी यांनी पाहणी केली.


माटुंगा वर्कशॉपमध्ये काम

यांसदर्भात रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, लोकल देखभाल-दुरुस्तीसाठी वर्कशॉपमध्ये आल्यावर त्यात बदल करणे शक्य होतं. माटुंगा वर्कशॉपमध्ये आसन व्यवस्थेत बदल करण्याचं काम केलं जात आहे. देखभाल-दुरुस्तीसाठी येणाऱ्या लोकलला जवळपास पंधरा दिवस ते एक महिना लागतो. आणखी आठ लोकलमध्ये बदल करण्यासाठी सहा महिने लागणार अाहेत.



हेही वाचा -

पश्चिम रेल्वेकडून १३३८ बेवारस मुलांची सुटका

खूशखबर... मेट्रो २ ब सह ठाणे मेट्रोच्या कामाला सुरूवात



 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा