पंतप्रधानांच्या नकारानंतरही सीएसएमटी म्युझियमसाठी निविदा

शुक्रवारी मध्य रेल्वेने प्रस्तावित म्युझियम संदर्भात ई-निविदा मागवल्या. त्यानुसार, संपूर्णत: म्युझियम वातानुकूलित करण्यात येणार असून त्याचं प्रतिबिंब निविदेच्या जाहिरातीतून उमटलं आहे. या कामासाठी जवळपास ६ कोटी २१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यासाठी या निविदा मागवण्यात आल्या आहेत.

पंतप्रधानांच्या नकारानंतरही सीएसएमटी म्युझियमसाठी निविदा
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)च्या मुख्य इमारतीत हेरिटेज म्युझियम उभारण्याच्या योजनेला पंतप्रधान नरेंद मोदी यांनी नकार दिल्याचं म्हटलं जात आहे. तरीही शुक्रवारी मध्य रेल्वेने प्रस्तावित म्युझियम संदर्भात ई-निविदा मागवल्या. त्यानुसार, संपूर्णत: म्युझियम वातानुकूलित करण्यात येणार असून त्याचं प्रतिबिंब निविदेच्या जाहिरातीतून उमटलं आहे. या कामासाठी जवळपास ६ कोटी २१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यासाठी या निविदा मागवण्यात आल्या आहेत.


कर्मचाऱ्यांकडून विरोध

सीएसएमटीचं म्युझियममध्ये रुपांतर करण्याचा मानस रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केल्यानंतर त्याला या मुख्यालयात काम करणाऱ्या मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून विरोध होत आहे. कामगार संघटनांचा या म्युझियमला विरोध असतानाच रेल्वे बोर्डासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्युझियम संदर्भात काही मुद्दे उपस्थित केल्याने हा प्रस्ताव रद्द झाल्याचं वृत्त पसरलं.


ई-निविदा प्रसिद्ध

शुक्रवारी मध्य रेल्वेच्या इ- निविदेनांमध्ये मुख्यालयाचं म्युझियममध्ये रुपांतर करण्याचा भाग म्हणून एसी यंत्रणा बसवण्याचा उल्लेख आहे. त्यासाठी सुमारे ६ कोटी २१ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.


संभ्रम कायम

म्युझियमचा प्रस्ताव रद्द झाल्याचं वृत्त आलं असलं तरी रेल्वे प्रशासनाकडून तसं अजून अधिकृत कळवण्यात आलेलं नाही. रेल्वे बोर्डकडून हा प्रस्ताव रद्द झाल्याचे अधिकृत आदेश आल्यानंतरच ही प्रक्रिया थांबवण्यात येईल, असं स्पष्ट करण्यात आलं. पण, अद्याप तशा सूचना न आल्याने निविदा मागवण्यासह अन्य प्रक्रिया सुरू राहणार आहे.हेही वाचा-

आता रेल्वे कर्मचाऱ्यांचं आमरण उपोषण

टेक्सटाईल्स म्युझियममध्ये गिरणी कामगारांच्या मुलांना नोकऱ्यासंबंधित विषय