Advertisement

लोकलमध्ये वाजणार अक्षय कुमारचं ‘बाला’ गाणं?

रेल्वे सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं विविध स्लोगन लोकलच्या डब्यातच लावण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकलमध्ये वाजणार अक्षय कुमारचं ‘बाला’ गाणं?
SHARES

रेल्वे सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं विविध स्लोगन लोकलच्या डब्यातच लावण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकांवर आणि लोकल डब्यात त्यासंदर्भात उद्धोषणा देखील करण्यात येणार आहेत. यासाठी स्लोगन तयार करण्यात आले असून, त्याची पडताळणी रेल्वेकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या स्लोगनमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या 'हाऊसफूल-४' या चित्रपटातील 'बाला' या गाण्याचा वापर केल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत रेल्वेकडून अधिकृत माहिती मिळालेली नसून लवकरच हे गाणं लोकलमध्ये वाजण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे.

चित्रपटातील डायलॉगचा वापर

रेल्वे स्थानकात प्रवासी चालती गाडी पकडतात, अशा प्रवाशांना रोखण्यासाठी चित्रपटातील डायलॉगचा वापर रेल्वेनं याआधी केला होता. याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. विशेष म्हणजे तरुणांमध्ये नव्या गाण्याचं आकर्षण जास्त असतं. त्यामुळे रेल्वे ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचं गाणं 'बाला' या गाण्याचा वापर करण्याची शक्यात वर्तवली जात आहे.

पादचारी पुलांचा वापर

रेल्वे ट्रॅक क्रॉस न करता पादचारी पुलांचा वापर करावा याबाबतच्या घोषणा रेल्वे प्रशासनाकडून वारंवार प्रवाशांना केल्या जातात. मात्र, तरीही अनेक प्रवासी रेल्वे ट्रॅक क्रॉस करतात. परिणामी त्यामुळं अपघात होतात. तसंच, या ट्रॅक क्रॉस करताना होणाऱ्या अपघातांची संख्या जास्त आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर गेल्या ५ वर्षात सुमारे २० हजार प्रवाशांचा अपघाती मृत्यु झाला असून, अनेक प्रवासी जखमी झालेले आहेत.

डायलॉगचे फलक

याआधी रेल्वे प्रशासनानं ‘जा सिमरन जा… प्लॅटफॉर्म भी साफ रखते हुए जा’, ‘भाई मेरे पास माँ है, तुम्हारे पास क्या हैं? मेरे मुँह में पान हैं… भाई थूंकना नही रेल परिसर में.. नही तो ५०० रुपया जुर्माना भरना पडेंगा’, अशा चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगचे फलक वापरून प्रवाशांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती करण्याचा प्रयत्न मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीनं यापूर्वी केला आहे.



हेही वाचा -

रिक्षा-टॅक्सी चालकांची ३ रुपये भाडेवाढीची मागणी

नोकरीच्या नावाखाली शिक्षिकेला चार वर्ष राबवले



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा