Advertisement

दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या

दिवाळीनिमित्त लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल ते करमळी, थिविम एक्स्प्रेसच्या जादा फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या
SHARES
Advertisement

दिवाळीच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गावी अथवा इतर ठिकाणी फिरण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांकरीता आनंदाची बातमी आहे.

मध्य रेल्वे मार्गावर दिवाळीनिमित्त एक्स्प्रेसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड असते. त्यामुळं स्थानकातीही प्रवाशांची

मोठ्या प्रमाणात गर्दी जमते. या गर्दीमुळं प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी गर्दी विभाजित करण्यासाठी लोकमान्य टिळक

टर्मिनस, पनवेल ते करमळी, थिविम एक्स्प्रेसच्या जादा फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.


जादा गाड्या

लोकमान्य टिळक टर्मिनसहून २५ आॅक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीमध्ये दर शुक्रवारी रात्री १.१० वाजता करमळीसाठी गाडी सोडण्यात येणार आहेत. ही गाडी त्याच दिवशी करमळी स्थानकात दुपारी १.३० वाजता पोहोचणार आहे. तसंच, करमळीहून दर शुक्रवारी दुपारी २ वाजता गाडी सुटणार असून ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसला पहाटे ३.४० वाजता पोहोचणार आहे.

२५ आॅक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीदरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनसहून दर शुक्रवारी सकाळी ८.४५ वाजता थिविमसाठी गाडी सुटणाक आहे. ही गाडी थिविम इथं दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहोचणार आहे. २७ आॅक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीदरम्यान थिविम येथून दर रविवारी दुपारी २.३० गाडी लोकमान्य टिळक टर्मिनससाठी गाडी सुटणार असून, ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसला दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४० वाजता पोहोचणार आहे.

२६ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीमध्ये थिविमहून दर शनिवारी सकाळी ११.३० वाजता गाडी पनवेलसाठी गाडी सुटणार आहे. ही गाडी पनवेल इथं त्याच दिवशी रात्री ११.१५ वाजता पोहोचणार आहे. तसंच, पनवेलहून दर शनिवारी रात्री ११.५५ वाजता थिविमसाठी सुटणार आहे. ही गाडी थिविम इथं दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता पोहोचणार आहे.

एक्स्प्रेसला जादा डबे

एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ११०८५, ११०८६, ११०९९, १११०० या लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एसी डबल डेकर या गाडीला द्वितीय श्रेणीचा एक एसी डबा आणि तृतीय श्रेणीचे ३ एसी डबे जोडण्यात येणार आहेत. त्याशिवाय, गाडी क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एसी डबल डेकर एक्स्प्रेसला दर शनिवारी ११ जानेवारीपर्यंत जादा डबे जोडण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ११०८५ लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एसी डबल डेकर एक्स्प्रेसला दर सोमवारी आणि बुधवारी ८ जानेवारीपर्यंत जादा डबे जोडण्यात येणार आहेत.हेही वाचा -

बेस्टच्या इलेक्ट्रीक बसला आग

PMC बँकेचे ठेवीदार RBI विरोधात आझाद मैदानात करणार आंदोलनसंबंधित विषय
Advertisement