Advertisement

मध्य रेल्वेची सिग्नलचा ऑडिओ अलार्म वाजण्याची यंत्रणा यशस्वी

मध्य रेल्वेचा सिग्नल रेड आहे की ग्रीन असे सांगणारा हा बोलका सिग्नल प्रकल्प यशस्वी झाला असून उर्वरित लोकलमध्येही ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेची सिग्नलचा ऑडिओ अलार्म वाजण्याची यंत्रणा यशस्वी
SHARES

मध्य रेल्वेनं लोकलच्या मोटरमननं रेल्वे मार्गावरील रेड सिग्नल जंप करू नये यासाठी लोकलच्या मोटरमनच्या केबिनमध्ये सिग्नलचा ऑडिओ अलार्म बसविण्यात आला होता. या सिग्नलचा ऑडिओ अलार्म वाजण्याच्या सुविधेमुळं मोटरमनकडून चुका होण्याचे प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळं मध्य रेल्वेचा सिग्नल रेड आहे की ग्रीन असे सांगणारा हा बोलका सिग्नल प्रकल्प यशस्वी झाला असून उर्वरित लोकलमध्येही ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.


अलार्म होणारी यंत्रणा

मोटरमननं लाल सिग्नल ओलांडल्यास ऑक्झिलरी वॉर्निंग सिस्टममुळं लोकल जरी पुढे गेली तरी ऑटोमेटिक ब्रेक लागून ती बंद पडते. मात्र, यामुळं मोठ्या प्रमाणात वेळ वाया जातो. हा वेळ वाया जाऊ नये यासाठी, मध्य रेल्वेनं मोटरमनच्या मदतीसाठी अलार्म होणारी यंत्रणा मोटरमनच्या केबीनमध्ये बसविली होती. त्यामुळं पिवळा सिग्नल ओलांडताच मोटरमनला पुढे लाल सिग्नल येणार असल्याचे सावध करणारा अलार्म होतो.


रेड सिग्नल जंप

अनेकदा रेल्वे मार्गावर रेड सिग्नल जंप करण्याच्या घटना घडतात. त्यामुळं मोटरमनना उपनगरीय सेक्शनमधून कमी महत्त्वाच्या ठिकाणी बदली करण्याच्या कारवाईला सामोरं जावं लागतं. सध्या एकूण २२ लोकलमध्ये ही ऑडिओ अलार्मनं सिग्नल कोणता आहे, हे सांगण्याची यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यापैकी कोणत्याही मोटरमननं रेड सिग्नल जंप केलेला नसल्यानं आता उर्वरित लोकलमध्येही ही यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचं समजतं आहे.



हेही वाचा -

शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत घेणार मंत्रीपदाची शपथ

डॉ. पायलच्या शवविच्छेदनाच्या अहवालात मानेवर लिगेचरचं निशाण



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा