Advertisement

राज्यराणी एक्स्प्रेस धावणार नांदेडपर्यंत

मध्य रेल्वे मार्गावरील मनमाडला जाणारी राज्यराणी एक्स्प्रेस आता नांदेडपर्यंत धावणार आहे.

राज्यराणी एक्स्प्रेस धावणार नांदेडपर्यंत
SHARES

मध्य रेल्वे मार्गावरील मनमाडला जाणारी राज्यराणी एक्स्प्रेस आता नांदेडपर्यंत धावणार आहे. मध्य रेल्वेकडून १० जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता नाशिकमधील रेल्वे प्रवासी संघटनांनी त्याला विरोध दर्शविला आहे. नांदेडहून राज्यराणी चालवताना १८ ऐवजी १७ डब्यांची धावणार आहे.

विना वातानुकूलित

एक द्वितीय श्रेणीचा आसन डबा कमी करतानाच राज्यराणी एक्स्प्रेसमधील विना वातानुकूलित आसन डब्यांच्या बदल्यात वातानुकूलित, स्लीपर डबे जोडण्यात आले आहेत. एकंदरीतच या एक्स्प्रेसचा चेहरोमोहराच बदलण्यात आला असून नाशिकमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची काही प्रमाणात डोकेदुखी वाढणार आहे. ट्रेन क्रमांक १७६११ राज्यराणी एक्स्प्रेस मनमाडऐवजी हजुरसाहिब नांदेड येथून रात्री २२.०० वाजता सुटणार आणि सीएसएमटी इथं दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०७ वाजता पोहोचणार आहे. ट्रेन क्रमांक १७६१२ राज्यराणी ११ जानेवारीला सीएसएमटी येथून १८.४५ वाजता सुटून हजुरसाहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२० वाजता पोहोचणार आहे. आधी १८ डब्यांची असलेल्या राज्यराणी एक्स्प्रेसचा एक डबा कमी करण्यात आला आहे.

आसन डब्यांऐवजी ८ डबे

९ द्वितीय श्रेणी आसन डब्यांऐवजी ८ डबे असणार आहेत. तर १ वातानुकूलित टू टायर, १ वातानुकूलित थ्री टायर, ३ स्लीपर श्रेणीचे डबे व २ सामान्य द्वितीय श्रेणी कम गार्ड ब्रेक व्हॅन डबे असतील. यापूर्वी राज्यराणी एक्स्प्रेसला एक वातानुकूलित टू टायर आणि सर्व डबे द्वितीय श्रेणी आसनप्रकारातील होते. मात्र, यातही मोठे बदल केले आहेत. सीएसएमटी ते मनमाड दरम्यानच्या थांब्यात मध्य रेल्वेने कोणतेही बदल केले नाही आहेत. त्यानंतर मात्र रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, पारतुर, सेलू, मनवट रोड, परभणी जक्शन व पुर्णा जक्शन इथं थांबा देण्यात आला आहे.



हेही वाचा -

दाऊदचा हस्तक गँगस्टर एजाज लकडावालाला अटक

JNU Protest: असले प्रकार भाजपवाले करायचे, असं का म्हणाले पवार?



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा