Advertisement

निसर्ग चक्रीवादळाचा फटका; रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मध्य रेल्वेने मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा फटका; रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
SHARES
Advertisement

निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढला असून दुपारी अलिबाग किनाऱ्यावर हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळं संपूर्ण कोकण पट्टा आणि दमण, गुजरात वेगानं वारे वाहत आहेत. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर १ जूनपासून सुरू करण्यात आलेल्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. 

मुंबईहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळत बदल 

  • एलटीटी-गोरखपूर विशेष ट्रेन सकाळी 11. 10 ऐवजी रात्री 8 वाजता सुटणार. 
  • एलटीटी-थिरुअनंतरपुरम विशेष ट्रेन सकाळी 11.140 ऐवजी संध्याकाळी 6 वाजता सुटणार. 
  • एलटीटी-दरभंगा विशेष ट्रेन दुपारी 12.15 ऐवजी रात्री 8.30 वाजता सुटणार. 
  • एलटीटी-वाराणसी विशेष ट्रेन दुपारी 12.40 ऐवजी रात्री 9 वाजता सुटणार. 
  • सीएसएमटी-भुवनेश्वर विशेष ट्रेन दुपारी 3 ऐवजी रात्री 8 वाजता सुटणार.

'या' रेल्वे उशिरानं मुंबईत पोहोचणार 

  • सकाळी 11.30 वाजता मुंबईला पोहोचणारी पाटणा-एलटीटी विशेष ट्रेन नियोजित वेळेपेक्षा उशिराने पोहोचेल. 
  • दुपारी 2.15 वाजता मुंबईला पोहोचणारी वाराणसी-सीएसएमटी विशेष ट्रेन नियोजित वेळेपेक्षा उशिराने दाखल होईल.
  • दुपारी 4.40 वाजता पोहोचणारी थिरुअनंतपुरम-एलटीटी स्पेशल ट्रेन पुण्याला वळवून एलटीटीला नियोजित वेळेपेक्षा उशिराने पोहोचेल.

मुंबई पोलीस देखील सज्ज झालेले आहेत. नागरिकांना समुद्र किनारी न जाण्याचं आवाहन पोलीसांकडून करण्यात आलं आहे. मुंबई पोलिस कर्मचारी आणि त्यांच्यासोबत अतिरिक्त पोलिस दल, एनडीआरएफ, एसआरपीएफ, होमगार्डचे तैनात करण्यात आलेले आहेत. ज्या ठिकाणी पाणी साचतं अशा ठिकाणी लोकांनी जाऊ नये, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच ट्रॅफिक विभागाकडून ट्रॅफिकमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. हेही वाचा -

निसर्ग चक्रीवादळ मुंबईपासून १५० कि.मी. अंतरावर

गाडीनं प्रवास करत असाल तर हातोडा जवळ ठेवा- महापालिकासंबंधित विषय
Advertisement