Advertisement

बेस्टच्या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी ५० लाखांची नुकसान भरपाई

कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आपला जीव धोक्यात घालून बेस्टचे कर्मचारी सेवा देत आहे.

बेस्टच्या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी ५० लाखांची नुकसान भरपाई
SHARES

लॉकडाऊनच्या काळात बेस्ट अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देत आहे. मात्र या कर्मचाऱ्यांनाच कोरोनानं घेरलं आहे. आतापर्यंत ४०५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, ५४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. अत्यावश्यक सेवेसंबंधित कर्तव्य बजावताना कोरोनामुळं मृत्यू पावलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना उपक्रमाकडून ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

बेस्टनं आपली हद्द पार केली असून, मुंबईसह विरार ते आसगावपर्यंत आपली वाहतूक सेवा देत आहे. परंतु, कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आपला जीव धोक्यात घालून बेस्टचे कर्मचारी सेवा देत आहे. लॉकडाऊनपूर्वी बेस्ट दररोज ३१ ते ३२ लाख प्रवाशांना सेवा देत होती. मात्र, आता मनुष्यबळाअभावी ४ ते ५ लाख प्रवाशांना सेवा देतानाही नाकीनऊ येत आहे. ८ जूनला बेस्टनं ४.१९ लाख प्रवाशांनी प्रवास केला, तर दुसऱ्या दिवशी यात ५४ हजार प्रवाशांची भर पडली. प्रवासी वाढत असले तरी मनुष्यबळाअभावी बेस्टला फेऱ्या वाढविण्यात अडचणी येत असून सामान्य प्रवाशांची ससेहोलपट सुरूच आहे.

हेही वाचा - बेस्टच्या ५४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू

पहिल्या दिवशी ४ लाख १९ हजार १५३ प्रवाशांनी बसमधून प्रवास केला. बेस्टने ३५०० पैकी २,५०० बस चालवण्याचे नियोजन केले होते. मात्र गर्दीच्या वेळी केवळ २ हजार १३२ बसगाड्या धावल्या. ९ जूनला प्रवासी संख्येत आणखी वाढ झाली. या दिवशी ४ लाख ७३ हजार ६८० प्रवाशांनी प्रवास केला. मात्र प्रवाशांचे पहिल्या दिवशी झालेले हाल दुसऱ्या दिवशीही कायम राहिले. मंगळवारीही केवळ २,३०० पर्यंत बस धावल्या. त्यानंतर बुधवारीही सकाळी गर्दीच्या वेळी तीच परिस्थिती होती. मर्यादित प्रवाशांमुळे भरून आलेली बस मधल्या थांब्यांवर थांबत नाही. त्यामुळं ताटकळत दुसऱ्या बसची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नसते.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी संबंधित विविध मागण्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी ११ जून ते १३ जूनपर्यंत आगार व आस्थापनावर मूक निदर्शनं केली जाणार असल्याचं बेस्ट संयुक्त कामगार कृती समिती नेते शशांक राव यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार, बुधवारी घाटकोपर आगारात मूक निदर्शनं करण्यात आली.हेही वाचा -

मनुष्यबळाअभावी बेस्टला फेऱ्या वाढविण्यात अडचणी

पूर परिस्थितीचे पूर्वानुमान देणारी प्रणाली सज्जRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा