Advertisement

बेस्ट कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात


बेस्ट कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात
SHARES

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनच्या काळात बेस्टचे कर्मचारी जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुरवत आहेत. मात्र, या कर्मचाऱ्यांनाच कोरोनाचा संसर्गानं घेरलं आहे. बेस्टच्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अशी परिस्थिती असली तरी हजारो कामगारांचा संघर्ष दुर्लक्षित ठरत असल्याती माहिती समोर येत आहे. या अनेक कर्मचाऱ्यांना समस्यांना सामोरं जावं लागत आहे. 

बेस्ट कामगार 'आरोग्य कवच' विम्यापासून दूर असून इतर सोयीसुविधा पुरविण्याबाबतच्या त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत. लॉकडाउनमध्ये लोकल आणि बेस्टची वाहतूक थांबविण्यात आल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीची संपूर्ण जबाबदारी बेस्ट उपक्रमावर सोपविण्यात आली. आरोग्य कर्मचारी, पोलिसांसह अनेक कर्मचारी बेस्ट बसचा वापर करत आहेत. परंतु या बेस्ट कामगारांना प्राथमिक सुविधा पुरवण्यात बेस्ट उपक्रम अपयशी ठरले. 

हेही वाचा - Coronavirus Updates : बेस्टचे कर्मचारी आरोग्य विभागावर नाराज

मुंबईतील दूरवरच्या उपनगरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतूक करताना बेस्टच्या कामगारांनाही करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. हातमोजे, मास्क, सॅनिटायझर पुरविण्यात येत नसल्याच्या असंख्य तक्रारी होत्या. बससह आगारातही सुरक्षित वावराचे आवश्यक नियम पाळण्यात अडचणी येत गेल्या. कोरोना संसर्ग झालेल्या बेस्ट कामगारांची संख्या २५४वर पोहोचली आहे. तसंच, मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ८ वर पोहोचली आहे. 

हेही वाचा - शुक्रवारपासून बेस्टकडून स्थलांतरितांना प्रवास मोफत

कोरोनावरील उपचारानंतर १४० जणांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. कामगारांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लागण होऊनही बेस्ट कामगारांना 'आरोग्य कवच' विम्यासह अन्य सुविधा दिल्या जात नसल्याबद्दल कामगारांमध्ये नाराजी आहे. तसेच, अजूनही बेस्ट आगार, बसफेऱ्यांमध्ये सुरक्षित वावराचे निर्बंध पाळले जात नसल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहतुकीसाठी मर्यादित प्रमाणात बसफेऱ्या आहेत. दैनंदिन स्तरावर १५०० ते १६०० बसफेऱ्या चालविल्या जातात. 



हेही वाचा -

पावसाळी आजारांसाठी प्रत्येक वॉर्डातील दवाखाने, प्रसुतिगृह, हेल्थ पोस्ट सज्ज

गोरेगावातील कोरोनाग्रस्तांची संख्या हजारांच्या उंबरठ्यावर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा