Advertisement

वाहन चालकांना किमान ८ दिवसांचं प्रशिक्षण दिलंच पाहिजे- परिवहनमंत्री

अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी वाहन चालकांना रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने योग्य प्रशिक्षण देणे गरजेचं आहे. त्यांना किमान ८ दिवसांचं प्रशिक्षण दिलं पाहिजे, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं.

वाहन चालकांना किमान ८ दिवसांचं प्रशिक्षण दिलंच पाहिजे- परिवहनमंत्री
SHARES

अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी वाहन चालकांना रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने योग्य प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. त्यांना किमान ८ दिवसांचं प्रशिक्षण दिलं पाहिजे, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. सह्याद्री अतिथीगृह इथं महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषदेची दहावी बैठक परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. (drivers must have driving training for 8 days to reduce road accidents says maharashtra transport minister anil parab)

वाहन अपघात छोट्या अथवा मोठ्या अपघातामुळे त्या कुटुंबाचं होणारं सामाजिक, भावनिक व आर्थिक नुकसान त्या कुटुंबाबरोबर समाजाला देखील सोसावं लागतं. अपघातामुळे वेळेचा अपव्यय तर होतोच पण त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेलासुद्धा अडचणी येतात. अपघातामुळे होणारं नुकसान प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हे राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या ३ टक्के असल्यामुळे सदर समस्या गंभीर आहे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणं गरजेचं आहे, असंही अनिल परब यांनी सांगितलं.

हेही वाचा- एसटी कर्मचाऱ्यांचा एक महिन्याच्या पगार येत्या गुरुवारपर्यंत होणार

अपघात प्रवण क्षेत्र कमी करण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात. तसंच योग्य नियोजन करून ग्रामीण आणि शहरांमधील अपघातप्रवण क्षेत्रे निवडावेत. व त्यावर दीर्घकाळ व तात्पुरत्या उपाय योजना केल्या जाव्यात. क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणारी वाहने, प्रवासी बसमधून विनापरवाना मालाची वाहतूक करणारी वाहने, विनापरवाना चालणारी बेकायदेशीर वाहतूक, तसंच दुचाकी रोड रेसिंग सारख्या बेकायदेशीर कृतीवर  कारवाई करण्याच्या सूचनाही अनिल परब यांनी केल्या.

बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीने दिलेले निर्देश, तसंच या निर्देशानुसार जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे कामकाज, अशा विविध विषयांच्या कार्यवाहीचा आढावा, अपघातांची संख्या कमी करण्यासाठी विविध विभागांनी करावयाच्या उपाययोजना, अनुज्ञप्ती निलंबन, अपघात सांख्यिकी इत्यादी विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, पोलीस महासंचालक (वाहतूक) भूषण कुमार उपाध्ये, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, सी आय आर टी, परिवहन आयुक्त रस्ता सुरक्षा विभाग, महामार्ग पोलीस वाहतूक आणि आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसंच प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा- तर फडणवीसांनी खुशाल राज्य सोडून जावं, अनिल परब संतापले

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा