Advertisement

पनवेल-वसई रेल्वेमार्गावर रोज होणार 'इतक्या' फेऱ्या

पनवेल-वसई रेल्वेमार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे रुळांच्या उभारणीसाठी अंतिम जागा निवडीसाठीचा प्रस्ताव एमआरव्हीसीने मध्य रेल्वेकडे पाठवला आहे.

पनवेल-वसई रेल्वेमार्गावर रोज होणार 'इतक्या' फेऱ्या
SHARES

पनवेल-वसई रेल्वेमार्गावर दररोज १७० फेऱ्या चालवण्याचं नियोजन मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने (एमआरव्हीसी) केलं आहे. पनवेल-वसई रेल्वेमार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे रुळांच्या उभारणीसाठी अंतिम जागा निवडीसाठीचा प्रस्ताव एमआरव्हीसीने मध्य रेल्वेकडे पाठवला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रकल्प मार्गी लागेल. 

 हार्बर आणि मुख्य मार्ग तसंच पश्चिम रेल्वेला जोडणारा मध्य रेल्वेचा हा मार्ग आहे. हाच मार्ग पुढे कोकण रेल्वेला जोडला आहे. त्यामुळे या मार्गाच्या  चौपदरीकरणाची मागणी २०१२ पासून होत आहे. पनवेल ते वसई या ६३ किमी मार्गाचं चौपदरीकरण होणार आहे. यासाठी ७ हजार ८७२ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या मार्गावर आणखी ११ स्थानके तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील एकूण २४ स्थानके होतील. चौपदरीकरणानंतर या मार्गावरून दररोज १७० फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. 

पनेवल ते वसई मार्गावर सध्या मेमू गाड्या धावतात. या प्रवासाला एक तास १९ मिनिटे लागतात. लोकल सुरू झाली की हा वेळ आणखी कमी होईल.  सध्या पनवेल ते पेणदरम्यान मेमू धावतात. त्याऐवजी अलिबागपर्यंत लोकल नेण्याचा प्रस्ताव आहे. विरार- डहाणू मार्गाच्या चौपदरीकरणानंतर येथील लोकल डहाणूपर्यंत नेण्याचं नियोजन आहे.हेही वाचा -

मेट्रोविरोधात शिवसेनेचं गिरगावात आंदोलन

रणजित सिंगला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

संबंधित विषय