Advertisement

'देवी'च्या नावानं !


'देवी'च्या नावानं !
SHARES

मुंबईतील लोकल रेल्वे स्थानकांना ब्रिटिशांनी दिलेली नावे आता हळूहळू बदलत आहेत. आता इंग्रजी नावांऐवजी मराठी नावे लोकल स्थानकांच्या फलकांवर झळकलेली दिसणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नामांतर ‘प्रभादेवी स्थानक’ असे करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेने यासंदर्भातील पत्र संबंधित अधिकाऱ्यांना जारी करत नामांतराला मंजुरी दिली आहे.

मागील अनेक वर्षांपासूनची ही मागणी अखेर मान्य झाली असून आता मुंबईतील दोन रेल्वे स्थानकांच्या नावांचे फलक नवीन नावाने झळकणार आहेत. सीएसटी रेल्वे स्टेशनचे नाव यापूर्वीच सीएसटीएम अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करण्यात आले आहे. त्यानंतर आता पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाचे देखील नाव बदलण्यात आले आहे. मुंबईतील या दोन्ही स्थानकांची नावे बदलण्यास यापूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाने मान्यता दिली होती. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि एल्फिन्सटन रोड या दोन्ही स्थानकांची नवीन नावे इंग्रजी आणि मराठीत लिहून राजपत्रात प्रसिद्ध करुन त्याप्रमाणे नावांमध्ये बदल करावा, अशी सूचना केंद्राने राज्याला दिली होती. एल्फिन्स्टन म्हणजे नव्या प्रभादेवी स्टेशनचा कोड पीबीएचडी असेल.


एल्फिन्स्टन स्टेशनविषयी काही महत्त्वपूर्ण नोंदी - 

  • 1868मध्ये एल्फिन्स्टन पुलाचं (भटणकर मार्ग) बांधकाम
  • पुलाला तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचे नाव
  • 1884मध्ये या पुलाच्या नावावरुन एल्फिन्स्टन रोड या नव्या रेल्वे स्टेशनचे बांधकाम
  • ब्रिटिशांच्या विरोधातील 1942 सालच्या 'भारत छोडो' आंदोलनात सर्वप्रथन एल्फिन्स्टन नावाला आक्षेप
  • स्टेशनजवळच असलेल्या प्रभावती देवीच्या मंदिरावरुन परिसराला प्रभादेवी नाव



हे देखील वाचा -  

एलफिन्स्टन रोड होणार प्रभादेवी


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा