Advertisement

शौचालय महिलांचं घुसले पुरूष!

२६ नोव्हेंबर २०१७ वांद्रे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर महिलांसाठी बांधलेल्या शौचालयाचं उद्घाटन झालं होतं. पण, या शौचालयात महिलांऐवजी पुरुषांना देखील प्रवेश मिळत असल्याचं निदर्शनास आलं. ज्यादिवशी या शौचालयाचं उद्घाटन झालं होतं, त्याच दिवशी दुपारी शौचालयात दोन पुरुष प्रवासी गेल्याचं आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी पाहिलं.

शौचालय महिलांचं घुसले पुरूष!
SHARES

महिलांच्या राखीव शौचालयात पुरुषांना प्रवेश दिल्याप्रकरणी वांद्रे रेल्वे स्थानकातील शौचालय कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल ६ महिन्यानंतर वांद्रे रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता.


पहिल्याच दिवशी नियमभंग

२६ नोव्हेंबर २०१७ वांद्रे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर महिलांसाठी बांधलेल्या शौचालयाचं उद्घाटन झालं होतं. पण, या शौचालयात महिलांऐवजी पुरुषांना देखील प्रवेश मिळत असल्याचं निदर्शनास आलं. ज्यादिवशी या शौचालयाचं उद्घाटन झालं होतं, त्याच दिवशी दुपारी शौचालयात दोन पुरुष प्रवासी गेल्याचं आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी पाहिलं.


पोलिसांनी देखील पाहिलं

शेख यांनी तात्काळ ही बाब रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिस शौचालयाच्या ठिकाणी पोहोचले, त्या वेळी एक प्रवासी शौचालयातून बाहेर पडत असल्याचं पोलिसांना दिसलं. तर, एक प्रवासी पोलिस येण्याआधीच तिथून निसटला होता. अधिक चौकशी केली असता, पुरुष शौचालयाबाहेर गर्दी असल्याने शौचालय कर्मचारी गुलशन कुमार यानेच संबंधित पुरुषांना महिला शौचालयाचा वापर करण्यास परवानगी दिल्याचं समोर आलं.


परवाना रद्द करा

संबंधित घटनेवेळी शेख यांच्या तक्रारीवरून वांद्रे रेल्वे पोलिसांनी प्रवाशासह शौचालय कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर महिलांच्या शौचालयाबाबत हलगर्जीपणा दाखवणाऱ्या कंत्राटदाराचा परवाना रद्द करत कारवाई करण्याची मागणी शेख यांनी पत्राद्वारे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक यांना केली होती. त्यानंतर या प्रकरणी रेल्वे प्रशासनाने गुन्ह्याची नोंद करत शुक्रवारी कारवाईला सुरुवात केली.



हेही वाचा-

मध्य रेल्वेचा विक्रम, एप्रिल महिन्यात फुकट्यांकडून ११ कोटी दंड वसूल

उन्हाळी सुट्ट्यांसाठी 'या' मार्गावर ६ स्पेशल ट्रेन्स



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा