Advertisement

गोरेगाव ते पनवेल लोकल ऑगस्टपर्यंत सेवेत?


गोरेगाव ते पनवेल लोकल ऑगस्टपर्यंत सेवेत?
SHARES

बहुचर्चित हार्बर मार्गावरून गोरेगाव ते पनवेल थेट लोकल सेवा सुरू करण्याच्या प्रवाशांच्या मागणीला मध्य रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अंधेरी-पनवेल लोकलच्या आठ फेऱ्यांचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास ऑगस्टपर्यत ही सेवा सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


दुसऱ्या टप्प्याचं काम प्रगतिपथावर

हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते गोरेगावदरम्यान पहिल्या टप्प्याचा विस्तार करण्यात आला असून गोरेगाव ते पनवेल या दुसऱ्या टप्प्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. पश्चिम उपनगरातील बोरिवली, कांदिवली, मालाड आणि गोरेगाव परिसरातून नोकरी आणि व्यावसायानिमित्त नागरिक सानपाडा, बेलापूर, वाशी, पनवेलला रोज प्रवास करतात. या प्रवाशांनी 'हार्बरचा अंधेरी-पनवेल लोकलचा विस्तार गोरेगावपर्यत करण्यात यावा', अशी मागणी केली होती.


प्रवाशांची कटकटीतून होणार सुटका!

सध्या अंधेरी ते पनवेलदरम्यान लोकलच्या १६ फेऱ्या होतात. त्यापैकी आठ फेऱ्यांचा विस्तार गोरेगावपर्यत करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी परवानगी दिल्यास गोरेगाव-पनवेल ही थेट लोकल सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. ही सेवा सुरू झाल्यास प्रवासाचा वेळ आणि लोकल बदलण्याच्या कटकटीपासून हजारो प्रवाशांची सुटका होणार आहे. तसंच मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील ताणही कमी होण्यास मदत होईल. ऑगस्टपर्यंत ही थेट लोकल सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.



हेही वाचा

मेट्रोमध्येही आता फर्स्टक्लास!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा