Advertisement

आता परदेशी प्रवाशांना भारतात प्रवेश, पण 'ही' आहे अट

परदेशी प्रवाशांना आता भारतात प्रवेश दिला जाणार आहे.

आता परदेशी प्रवाशांना भारतात प्रवेश, पण 'ही' आहे अट
SHARES

कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या परदेशी प्रवाशांना आता भारतात प्रवेश दिला जाणार आहे. भारतात प्रवेश दिल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येणार नाही. मात्र, भारतात प्रवेशापूर्वी आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट सादर करणं त्यांना बंधनकारक करण्यात आलं आहे.

पण ज्या प्रवाशींनी डब्ल्यूएचओ मान्यताप्राप्त लस घेतलेल्यांना किंवा राष्ट्रीय पातळीवर परस्पर करार केले आहेत, अशा देशांमधून येणाऱ्यांना ही मुभा आहे.

मात्र हायरिस्क (High Risk catergory) देशांमधून येण्याऱ्या लोकांना हा नियम लागू नाही. या देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांगलादेश, बोत्सवाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे आणि यूकेसह युरोपमधील देशांचा समावेश आहे.

“ज्या प्रवाशांचं पूर्णपणे लसीकरण झालं आहे आणि कोविड -19 ची लस घेऊन १५ दिवस उलटले आहेत, त्यांना विमानतळातून क्वारंटाईन आणि चाचणीशिवाय बाहेर पडण्याची परवानगी दिली जाईल. आगमनानंतर १४ दिवस त्यांच्या आरोग्याचे निरीक्षण त्यांनी स्वतः करायचे आहे”, असं आंतरराष्ट्रीय आगमनांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलं आहे.

मात्र COVID-19 RT-PCR चाचणीचा नेगेटिव्ह रिपोर्ट आगमनानंतर विमानतळावर सादर करणं आवश्यक आहे. चाचणी प्रवास सुरू करण्यापूर्वी ७२ तासांच्या आत घेणं गरजेचं आहे.

लसीचा एक डोस किंवा लसीकरण न झालेल्या प्रवाशांनी मूळ नियम आणि आवश्यक उपाययोजना लागू आहेत. या नियमांमध्ये आगमनानंतरच्या COVID-19 चाचणीसाठी नमुना देणे, सात दिवसांसाठी होम क्वारंटाईन, भारतात आल्याच्या आठव्या दिवशी पुन्हा COVID-19 चाचणी करणं यांचा समावेश आहे.

सर्व प्रवाशांनी नियोजित प्रवासापूर्वी ऑनलाईन एअर सुविधा पोर्टलवर (Air Suvidha) स्वयं-घोषणा (self declaration) फॉर्म भरणे आणि नेगेटिव्ह COVID-19 RT-PCR रिपोर्ट अपलोड करणे गरजेचे आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही चाचणी प्रवास सुरू करण्यापूर्वी ७२ तासांच्या आत घेण्यात यावी.



हेही वाचा

महापालिकेप्रमाणेच बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची मागणी

मुंबईची 'व्हिक्टोरिया' पुन्हा धावणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा