Advertisement

अॅपवर चालणाऱ्या टॅक्सीचे भाडे होणार समान


अॅपवर चालणाऱ्या टॅक्सीचे भाडे होणार समान
SHARES

मुंबई महानगरात सध्या वेगवेगळ्या कंपन्याद्वारे प्रवाशांना टॅक्सी कॅब सेवा पुरवली जात आहे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या कॅबचे दरही अर्थात वेगवेगळे आहेत. मात्र यापुढे सर्व टॅक्सी कॅबचे दर एकसमान पातळीवर येण्याची चिन्हे आहेत. कारण टॅक्सी कॅबचे भाडे ठरविण्यासाठी नेमलेल्या खटुआ समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला असून लवकरच यासंदर्भातील निर्णय अपेक्षित आहे.    


खटुआ समितीची नेमणूक

टॅक्सी चालकांसमोरील अडचणी, प्रवासी सुविधा अशा सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने १० ऑक्टोबर २०१६ मध्ये खटुआ समितीची नेमणूक केली होती. समितीने सर्व विषयांचा अहवाल तयार करत हा अहवाल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सोपवला आहे. त्यानुसार या अहवालावर एक ते दोन महिन्यांत निर्णय अपेक्षित आहे.


'ही' आहे टॅक्सी, रिक्षा चालकांची मागणी

काळी-पिवळी टॅक्सी आणि रिक्षा हे मुंबईकरांच्या वाहतुकीचे जुने साधन आहे. पण ओला आणि उबर सारख्या अॅपवर आधारीत टॅक्सीसेवेमुळे काळी-पिवळी टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या धंद्यावर संक्रात आली आहे. 


उत्तम सेवा, कमी भाडे

या दोन्ही साधनांच्या भाड्यात कमालिची तफावत असली, तरी ओला, उबर या खासगी कंपन्यांनी प्रवाशांना उत्तम सेवा देतानाच भाडेही कमी केल्याने प्रवाशांचा या साधनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे काळी-पिवळी टॅक्सी संघटना आणि रिक्षा चालकांनी एकसमान भाड्याची मागणी केली आहे.



हेही  वाचा - 

आता रिक्षा, टॅक्सीस्टँडचे फलक बीएमसी लावणार?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)  

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा