Advertisement

आता रिक्षा, टॅक्सीस्टँडचे फलक बीएमसी लावणार?


आता रिक्षा, टॅक्सीस्टँडचे फलक बीएमसी लावणार?
SHARES

मुंबईतील वाहतूककोंडी ही शेअर रिक्षा आणि टॅक्सींमुळे होत असून अनेकदा या वाहनांचे स्टँड कुठे आहेत? हेच मुंबईकरांना माहीत नसते. त्यामुळे आता रिक्षा आणि टॅक्सींचे तळ शोधून काढून त्यावर महापालिकेच्या माध्यमातून फलक लावले जाणार आहेत. 

मुंबईकरांना पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. परंतु, या महापालिकेवर आता रिक्षा आणि टॅक्सी स्टँडचे फलक लावण्याची वेळ आली आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीतील ‘टॅक्सी स्टँड, शेअर टॅक्सी स्टँड आणि शेअर रिक्षा स्टँड आदींचे फलक पुरवून ते बसवण्याची मागणी प्रादेशिक परवहिन अधिकाऱ्यांनी केली आहे. आता हे फलक लावण्याची मागणी टॅक्सी आणि रिक्षा संघटना तसेच चालकांकडून केली जात आहे.

वाहतूक पोलिसांमुळेच…

‘टॅक्सी स्टँड, शेअर टॅक्सी स्टँड आणि शेअर रिक्षा स्टँड अभावी टॅक्सी तसेच रिक्षा चालकांना सातत्याने वाहतूक पोलिसांच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते. अनेकदा यामुळे दंडही भरावा लागतो. परिणामी यामध्ये प्रवाशांची गैरसोय होत असून याबाबतच्या फलकामुळे वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होण्यास मदत होईल, असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

हे फलक पुरवण्यासाठी सुमारे 77 लाख रुपये खर्च केले जाणार असून यासाठी निविदा मागवण्यात येत आहेत. मुंबईतील सुमारे 540 फलक पुरवण्यासाठी हे कंत्राट मागवले आहेत. 4700 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर पिवळ्या रंगाद्वारे या स्टँडची जागा निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.



हेही वाचा -

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीच्या ऑनलाईन सर्वेक्षणाला अल्प प्रतिसाद

टॅक्सी स्वच्छ नसेल तर बसू नका - रावते


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा