Advertisement

एसटी बस आहे कुठं? आता लोकेशनची माहिती प्रवाशांना मिळणार

एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवासांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता एसटी बसच्या लोकेशनची माहिती प्रवाशांना मिळणार आहे.

एसटी बस आहे कुठं? आता लोकेशनची माहिती प्रवाशांना मिळणार
SHARES

एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवासांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता एसटी बसच्या लोकेशनची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या बसचं लोकेशन दर्शविणाऱ्या आणि ही माहिती एलसीडी टीव्ही संचाद्वारे बसस्थानकांवर प्रसारीत करणाऱ्या वाहन शोध व प्रवासी माहिती प्रणालीचा (vehicle tracking and passenger information system) परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

प्रवासाचं पूर्वनियोजन

या नव्या प्रणालीमुळे एसटी बस कोणत्या ठिकाणी पोहोचली आहे, हे प्रवाशांना समजणार आहे. तसंच, बस स्थानकावर एलसीडी टीव्ही संचाद्वारे एसटी गाड्यांची प्रत्यक्ष येण्याची व सुटण्याची वेळ कळणार आहे. आपल्या जवळील थांब्यावरून प्रत्यक्ष येणाऱ्या व सुटणाऱ्या फेऱ्यांची वेळ कळणार असल्यानं प्रवाशांना प्रवासाचं पूर्वनियोजन करता येईल व त्यांचा अमूल्य वेळ वाचणार आहे.

शिवनेरी सेवेचा प्रकल्प

एसटी महामंडळाच्या नाशिक विभाग तसेच मुंबई-पुणे-मुंबई, बोरीवली-पुणे-बोरीवली, ठाणे-पुणे-ठाणे या शिवनेरी सेवेचा व्हिटीएस - पीआयएस प्रकल्पाचा मंगळवारी लोकार्पण करण्यात आला. पुढील ५ ते ६ महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात सर्व एसटी वाहनांना व्हीटीएस (vehicle tracking system) बसविण्यात येणार असून, सर्व महत्वाच्या थांब्यावर पीआयएस संच (passenger information system) बसविण्यात येणार आहे. याबाबतचं काम प्रगतीपथावर आहे. त्याशिवाय प्रवाशांना बसचं लोकेशन समजण्यासाठी मोबाईल अॅप तयार करण्यात येत असून ते लवकरच ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.

१८ हजार बस

'एसटी महामंडळाच्या ताफ्यात १८ हजार बसेस असून,  दररोज ६७ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी कामकाजात सुसूत्रता आणनं तसंच, संपूर्ण कार्यक्षमतेनं काम होण्यासाठी एसटी महामंडळाध्ये माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून एसटीत वाहन शोध व प्रवासी माहिती प्रणाली (vehicle tracking and passenger information system) हा प्रकल्प राबविण्यात येत आहे', असं परिवहन मंत्री  दिवाकर रावते यांनी म्हटलं.

मध्यवर्ती नियंत्रण कक्ष

व्हिटीएस-पीआयएस प्रकल्पाच्या अंतर्गत एक मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालय, मुंबई सेंट्रल इथं तयार करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षामध्ये व्हिडीओ वॉल तयार करण्यात आली असून, इथं एसटी बसचं निरीक्षण करण्यात येणार आहे. यात वाहनाचा वेग, वाहनाचे आगमन व निर्गमन तसंच व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आवश्यक अहवाल प्राप्त होणार आहे.



हेही वाचा -

विशेष फेरीतील प्रवेशाकडे २० हजार विद्यार्थ्यांची पाठ

मुंबईतील ट्रॅफिक सिग्नल आणखी होणार स्मार्ट



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा