Advertisement

आर्थिक अडचणीत सापडलेल्या ST ला ६०० कोटींची मदत

राज्य सरकार एसटी महामंडळाला 600 कोटी रुपये देणार आहे.

आर्थिक अडचणीत सापडलेल्या ST ला ६०० कोटींची मदत
SHARES

राज्य सरकार (State Government) एसटी (ST) महामंडळाला 600 कोटी रुपये देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे. त्यामुळे एसटीच्या ९८ हजार कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन देणं शक्य होणार आहे.

राज्यात कोरोनाचं (Coronavirus) संकट निर्माण झाल्यानं लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे अनेक अस्थापना बंद झाले होते. शिवाय एसटीतून अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. तसंच ५० टक्के आसन क्षमतेनेच एसटी चालवण्याचे निर्बंधही घालण्यात आले होते. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नावर त्याचा थेट परिणाम झाला होता.

अत्यंत अल्प उत्पन्न मिळत असल्याने त्यातून दैनंदिन खर्च भागवणं शक्य नव्हतं. शिवाय ९८ हजार कामगारांचे पगारही रखडले होते. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्री (CM) आणि उपमुख्यमंत्र्यांना एसटीला आर्थिक मदत करण्याची विनंती केली होती. त्यांची ही मागणी मान्य झाली आहे.

एसटीला आर्थिक मदत मिळावी म्हणून एसटी महामंडळानं शासनाकडे आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या बाबतचे सादरीकरण आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना करण्यात आले. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर दैनंदिन खर्चासाठी ६०० कोटी रुपये पहिल्या टप्यात देण्याचे अजित पवार यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला थोडा दिलासा मिळाला आहे.

अनिल परब यांनी या आधीही एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून तब्बल १ हजार कोटी रुपये एसटी महामंडळाला मिळवून दिले होते. त्यातून गेल्या सहा महिन्यांमध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देणं शक्य झाले. 



हेही वाचा

भारतातील पहिलं मोबाईल CNG रिफिलिंग युनिट लाँच

राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये एसटी सेवा पूर्ववत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा