Advertisement

मेट्रो-३ चं 'मेक इन इंडिया', मेट्रोचे डबे बनणार भारतात

. मेट्रो-३ च्या डब्यांची निर्मिती करण्यासाठीची निविदा गुरूवारी 'एमएमआरसी'नं अंतिम केली. त्याप्रमाणं आॅलस्टाेम ट्रान्सपोर्ट इंडिया लि. आणि आॅलस्टोम ट्रान्सपोर्ट एस.ए. फ्रांस संयुक्त या कंपनीला डबे बनवण्याचं कंत्राट देण्यात आलं आहे.

मेट्रो-३ चं 'मेक इन इंडिया', मेट्रोचे डबे बनणार भारतात
SHARES

मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) नं आता मेक इन इंडियाची हाक दिली आहे. त्यानुसार कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पातील मेट्रोचे डबे आता भारतातच तयार केले जाणार आहेत. मेट्रो-३ च्या डब्यांची निर्मिती करण्यासाठीची निविदा गुरूवारी 'एमएमआरसी'नं अंतिम केली. त्याप्रमाणं आॅलस्टाेम ट्रान्सपोर्ट इंडिया लि. आणि आॅलस्टोम ट्रान्सपोर्ट एस.ए. फ्रांस संयुक्त या कंपनीला डबे बनवण्याचं कंत्राट देण्यात आलं आहे. त्यामुळं भारतातच मेट्रो-३ च्या २४८ डब्यांची निर्मिती होणार असल्याची माहिती एमएमआरसीनं दिली.


प्रकल्पाचं काम वेगात

'एमएमआरसी'नं २०२१ मध्ये कुलाबा-वांद्रे-सीप्झ प्रकल्प पूर्ण करत मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३२.५ किमी प्रकल्पाच्या भुयारी मार्गाचं काम सध्या वेगात सुरू आहे. तर दुसरीकडे रोलिंग स्टाॅकचं काम अर्थात डबे, ट्रॅक, सिग्नल यंत्रणासंबंधीचं काम पूर्ण करण्याकडे 'एमएमआरसी'चा कल आहे. त्याचाच भाग म्हणून मेट्रो-३ चे डब्बे तयार करण्यासाठी 'एमएमआरसी'नं काही महिन्यांपूर्वी निविदा मागवल्या होत्या.


निविदांना चांगला प्रतिसाद

या निविदेला कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यानुसार गुरूवारी निविदा अंतिम करत 'एमएमआरसी'नं आॅलस्टोमला कंत्राट दिलं आहे. मेट्रो-३ ला आर्थिक सहाय्य करणाऱ्या जायकाची मान्यता मिळाल्यानंतरच हे कंत्राट अंतिम करण्यात आल्याचंही 'एमएमआरसी'नं स्पष्ट केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे निविदा प्रक्रियेत फ्रान्सशी भागीदारी असलेल्या भारतातील आॅलस्टोम कंपनीनं बाजी मारल्यानं आता मेट्रो-३ च्या डब्यांची निर्मिती भारतातच होणार आहे. सध्या देशभर 'मेक इन इंडिया'चं वारं असताना मेट्रो-३ चे डबेही भारतात तयार होणार असल्यानं हे महत्त्वाचं मानल जात आहे.


२४८ डब्यांची निर्मिती

कंत्राटदानुसार आॅलस्टोम मेट्रोचे २४८ डब्यांची निर्मिती केली जाणार आहे. तर डब्याच डिझाईन, निर्मिती, पुरवठा, मांडणी, चाचणी आणि इतर काम या कंपनीला करावी लागणार आहेत. ३.२ मीटर रूंदीच्या ८ डब्ब्यांच्या ३१ मेट्रो गाड्या तयार करण्यात येणार असून प्रत्येक डब्याची लांबी १८० किमी असणार आहे. तर डब्याची प्रवासी क्षमता ३०० असणार आहे. एका मेट्रो गाडीची प्रवासी क्षमता २३५० इतकी असणार आहे.


डब्यांची इतर वैशिष्ट्ये

  • २५ केव्ही एसी ट्रॅक्शन विद्युत पुरवठा
  • प्रत्येक बाजूला ४ दरवाजे
  • स्टेनलेस स्टीलचे डबे
  • एलईडी प्रकाश योजना
  • मेट्रो गाडीची कालमर्यादा ३५ वर्षे
  • उत्तम वेग नियंत्रण
  • वीज बचत करणारी मेट्रो गाडी
  • संपूर्ण वातानुकूलित
  • प्रवाशांच्या माहितीसाठी डिजिटल मार्ग नकाशा डब्यात असेल
  • मदत केंद्र



हेही वाचा-

मेट्रो-३ घेणार आणखी ७६ झाडांचा बळी!

मेट्रो-३ च्या कामामुळं वरळी नाका महापालिका शाळेला तडे



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा