Advertisement

एसटी प्रवाशांवर ३० टक्के तिकीटदरवाढीचा बोजा?

३० टक्के तिकीट दरवाढ ही खूप मोठी दरवाढ आहे. मागील काही महिन्यांमध्ये एसटीनं शिवशाही, शिवनेरीसह अनेक नवनव्या गाड्या सेवेत दाखल केल्या आहेत. यामुळे प्रवासी पुन्हा एसटीकडे वळत आहेत. त्यातच ३० टक्क्यांनी दरवाढ झाल्यास प्रवाशांच्या खिशाला तर चाट बसेलच, पण शिवशाही, शिवनेरीच्या प्रवाशांची संख्या तर कमी होणार नाही, ना अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

एसटी प्रवाशांवर ३० टक्के तिकीटदरवाढीचा बोजा?
SHARES

पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्यानं होत असलेल्या वाढीचा फटका महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा (एसटी)ला बसत असल्यानं एसटी प्रशासनाने तिकीटाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार एसटीच्या दरात थेट ३० टक्क्यांची वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनानं एसटी महामंडळाच्या अध्यक्षांसमोर मंजुरीसाठी पाठवल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मोठी दरवाढ

३० टक्के तिकीट दरवाढ ही खूप मोठी दरवाढ आहे. मागील काही महिन्यांमध्ये एसटीनं शिवशाही, शिवनेरीसह अनेक नवनव्या गाड्या सेवेत दाखल केल्या आहेत. यामुळे प्रवासी पुन्हा एसटीकडे वळत आहेत. त्यातच ३० टक्क्यांनी दरवाढ झाल्यास प्रवाशांच्या खिशाला तर चाट बसेलच, पण शिवशाही, शिवनेरीच्या प्रवाशांची संख्या तर कमी होणार नाही, ना अशीही भीती व्यक्त केली जात आहे.

४७० कोटींचा भार

एसटी महामंडळ गेल्या काही वर्षांनी तोट्यात असताना एसटीवर आर्थिक ताण काही केल्या कमी होताना दिसत नाही. उलट टोल, देखभाल आणि इतर कारणांनी एसटीवरील आर्थिक भार वाढतच चालला आहे. त्यातच गेल्या २० दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे डिझेल खरेदीच्या रुपानं एसटीला ४७० कोटींचा अतिरिक्त खर्च होत आहे.

तोटा भरून काढण्यासाठी

हा अतिरिक्त खर्च भरून काढण्यासाठी ४-५ दिवसांपूर्वीच एसटीने तिकीट दरवाढ करण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार ३० टक्क्यांची दरवाढ एसटीकडून करण्यात येणार आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला एसटी महामंडळाच्या अध्यक्षांच्या मंजुरीची प्रतिक्षा आहे. ही मंजुरी मिळाल्याबरोबर त्वरीत ही दरवाढ लागू होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा-

शिवशाहीच्या तिकीट दरात ज्येष्ठांना सवलत

डिझेलदरवाढीचा भडका, ४ वर्षांनंतर वाढणार एसटीचे तिकीटदर!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा