Advertisement

स्मार्ट कार्ड योजनेमुळं एसटीच्या ज्येष्ठ प्रवाशांचं हाल

एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेच्या नियोजनामुळं एसटीच्या ज्येष्ठ प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे.

स्मार्ट कार्ड योजनेमुळं एसटीच्या ज्येष्ठ प्रवाशांचं हाल
SHARES

एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि डिजिटायझेशनकडं कूच करण्यासाठी स्मार्ट कार्ड योजना काढली. तसंच, एसटीच्या सवलतींसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या स्मार्ट कार्ड योजनेच्या नियोजनामुळं एसटीच्या ज्येष्ठ प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. मुंबईतील ज्येष्ठांना कार्ड घेण्यासाठी मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला या ३ ठिकाणी केंद्र आहेत. त्यातच ज्येष्ठांना स्वत: उपस्थित राहण्याची सक्ती. त्यामुळे एसटीच्या कारभारावर ज्येष्ठ प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

कार्डसाठी हाल

खासगी कंपनीचा कारभार आणि एसटी अधिकाऱ्यांची बेफिकीरी यामुळं ज्येष्ठ नागरिकांचे कार्डसाठी हाल होत आहेत. तसंच, याबाबत तक्रार केल्यास एसटी मुख्यालयात ज्येष्ठांच्या तक्रारींकडं कानाडोळा होत असल्याची माहिती समोर येत आहे. एसटी मुख्यालयात कार्डबाबत विचारणा केली असता 'अद्याप कार्ड आलेले नाही, उद्या या', असं उत्तर दिलं जात आहे.

स्मार्ट कार्ड योजना

एसटीच्या वर्धापन दिनी स्मार्ट कार्ड योजना घोषित करण्यात आली होती. स्मार्ट कार्डसाठी डिसेंबर २०१९ ही कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसंच, कार्ड वितरीत करण्याची जबाबदारी ट्रायमॅक्स या खासगी कंपनीकडे आहे. या स्मार्ट कार्डची किंमत ५० रुपये असून १०० रुपयांच्या पटीत रीचार्ज करण्याची मुभा आहे.



हेही वाचा -

तेजुकायाची कागदी लगद्याची गणेशमूर्ती, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार नोंद

महापालिकेचे विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा