Advertisement

गणेशोत्सव २०१९: तेजुकायाची कागदी लगद्याची गणेशमूर्ती, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार नोंद

लालबाग येथील तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं कागदी लगद्याची १२ फूटांची गणेशमूर्ती साकारली आहे.

गणेशोत्सव २०१९: तेजुकायाची कागदी लगद्याची गणेशमूर्ती, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार नोंद
SHARES

मागील अनेक वर्ष गणेशोत्सवात 'प्लॅस्टर ऑफ पॅरिस'च्या मूर्तींमुळं प्रदूषण आणि निसर्गाची होत असलेली हानी लक्षात घेत अनेक गणेश भक्तांनी इकोफ्रेडली बाप्पाची निवड करत आहेत. तसंच, यंदाही 'इकोफ्रेंडली' गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी इकोफ्रेंडली बाप्पाच्या मुर्तीची मागणी वाढलेली पाहायला मिळते आहे. आशातच, लालबाग येथील तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं कागदी लगद्याची १२ फूटांची गणेशमूर्ती साकारली आहे. तेजुकाया मंडळाची ही गणेसमूर्ती यंदा भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. त्याशिवाय, या मूर्तीची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये करण्यात येणार असल्याचं समजतं.

देशातील पहिली मूर्ती

तेजुकाया मंडळाची ही गणेशमूर्ती मूर्तिकार राजन झाड यांनी साकारली आहे. तसंच, देशातील पहिली १२ फूटांची कागदी लगद्यापासून तयार केलेली ही गणेशमूर्ती असल्याचा दावा मंडळानं केला आहे. शासनाच्या पर्यापूरक विषयाला अनुसरून मंडळानं कागद, शाडू माती आणि डिंक यांचं मिश्रण करून दीड टन वजनाची मूर्ती तयार केली आहे.

मूर्तीचं काम अंतिम टप्प्यात

४ सप्टेंबर रोजी या १२ फूट गणेशमूर्तीचं वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियामध्ये नोंद केली जाणार आहे. दरम्यान, मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून ही गणेशमूर्ती साकारण्याचं काम करण्यात आलं असून, आता या मूर्तीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे.    



हेही वाचा -

महापालिकेचे विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित

मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना मुदत वाढ



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा