Advertisement

'या' वेळेत यूटीएस अॅपवरून मिळणार लोकलचं तिकीट

राज्य सरकारनं दिलेल्या परवानागीनंतर अखेर रेल्वे प्रशासनानं सर्वसमान्यांसाठी लोकल सेवा सुरू केली.

'या' वेळेत यूटीएस अॅपवरून मिळणार लोकलचं तिकीट
SHARES

राज्य सरकारनं दिलेल्या परवानागीनंतर अखेर रेल्वे प्रशासनानं सर्वसमान्यांसाठी लोकल सेवा सुरू केली. लोकल सेवा सुरू झाल्यानं स्थानकातील तिकीट खिडक्यांवरही प्रवाशांची गर्दी वाढली. परिणामी, वेळ कमी असल्यानं तिकीटासाठी रांगेत तातकाळत प्रवाशांना थांबावं लागतं. त्यामुळं रेल्वे प्रशासनानं यूटीएस अॅप उपलब्ध करून दिला. याच अॅपच्या माध्यमातून प्रवासी लोकलचं तिकीट काढून प्रवास करत आहेत. मात्र, कोरोनामुळं या अॅपवरील तिकीटावरही बंधन घालण्यात आलं असून, केवळ निश्चित वेळेतच या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना तिकीट काढता येणार आहे.

सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत राज्य सरकारनं सामान्यांना लोकल प्रवास करण्याची परवानगी दिलेली नाही. या काळात यूटीएस अॅपवरून कोणत्याही प्रकारचं तिकीट देण्यात येणार नाही. लॉकडाउन काळातील पासला मुदतवाढ देण्यात येणार असल्याचंही रेल्वे प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.

पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवरून सोमवारी २ लाख १० हजार २५८ तिकिटांची विक्री झाली. यात १ लाख ८१ हजार १७७ तिकीट आणि २९ हजार ८१ पासचा समावेश आहे. १० हजार ५६७ प्रवाशांच्या पासला मुदतवाढ देण्यात आली आहे. सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत ही स्थिती होती. शुक्रवारी २९ जानेवारीला १ लाख ७२ हजार ७३१ तिकिटांची विक्री झाली.

कोरोना संसर्गाची भीती कायम असल्यानं राज्य सरकारनं मर्यादित वेळेत प्रवासाला परवानगी दिली आहे. रेल्वेला त्यानुसार प्रस्ताव पाठवण्यात आल्यामुळं सर्वांना प्रवास मुभा नसलेल्या वेळेत मोबाइल तिकीट सेवा काही तासांसाठी बंद ठेवण्यात येत आहे. प्रवास वेळ सुरू झाल्यावर ही सुविधा पुन्हा सुरू राहणार असल्याची माहिती मिळते.



हेही वाचा -

भारत वि. इंग्लंड: क्वारंटाइननंतर दोन्ही संघ सरावासाठी सज्ज

प्रोत्साहन भत्त्यापोटी महापालिकेचे ३८३ कोटी खर्च


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा